शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल हे आपल्या आशिलाची बाजू न्यायालयासमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे न्यायालयाचं मत नाही, असं स्पष्ट करत राहुल नार्वेकर यांनी आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा केला आहे.