Headlines

ट्रम्पला आणा, पण नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा; सचिन अहिर यांचा सरकारला बोचरा टोला


शनिशिंगणापूरमध्ये शनी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावर उपसभापती सचिन अहिरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला. तसेच धीरज परदेशी हत्या प्रकरणात न्यायाची ग्वाही दिली.

Sachin Ahir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरुन भाजपचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अजब दावा केला होता. हा रस्ता न होण्यामागे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यामुळे क्रूड ऑईलचा सप्लाय भारताला कमी झाला. क्रूड ऑईलपासून पेट्रोल-डिझेल बनल्यानंतर त्याचे बायप्रोडक्ट डांबर असतं. ऑईल रिफायनरी क्षमता कमी झाल्याने डांबर बनवण्याची क्षमता कमी झाली. याला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे लोकं जास्त दारु प्यायला लागले, असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याची रि ओढत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी टोला लगावला.

अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट असतानाच आता या मुद्द्यावर राजकीय भाष्यही तीव्र होऊ लागले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरे यांनी नगर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून थेट आणि मिश्कील शब्दांत प्रशासनाचे लक्ष वेधले. डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा, असा बोचरा टोला लगावत त्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज अधोरेखित केली.

सचिन अहिर आणखी काय-काय म्हणाले?

शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्यावरील साडेसाती संपून राज्याची प्रगती व्हावी, यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शनिशिंगणापूर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. विकासकामांबाबत समाधान व्यक्त करताना स्थानिक प्रश्नांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा

माध्यमांशी संवाद साधताना गर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर अहिरे यांनी डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा, असे म्हणत रस्त्याच्या कामाला होत असलेल्या विलंबावर उपरोधिक भाष्य केले.

हा रस्ता जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्या रखडलेल्या कामाचा फटका दररोज हजारो नागरिकांना बसत आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला वेग देण्याची गरज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. नगर–मनमाड रस्त्याचा विषय माझ्यासमोर आला, तर तो मार्गी लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असेही अहिर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेनंतर आता रखडलेल्या रस्त्याच्या कामाला कधी गती मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

धीरज परदेशी कुटुंबाला न्याय मिळेल

अहिल्यानगरमधील धीरज परदेशी हत्या प्रकरणावरही सचिन अहिर यांनी भाष्य केले. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला नक्की न्याय मिळेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. धीरज परदेशी यांना नक्की न्याय मिळेल. या प्रकरणात योग्य ती कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अहि यांनी सांगितले.

एकीकडे जिल्ह्याच्या विकासाचा रखडलेला महामार्ग आणि दुसरीकडे चर्चेत असलेले धीरज परदेशी मृत्यू प्रकरण, या दोन्ही मुद्द्यांवर सचिन अहिर यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने त्यांच्या वक्तव्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आता ट्रम्पला आणा, पण रस्ता पूर्ण करा या टोमण्यानंतर नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला खरोखरच वेग येतो का? याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा