Headlines

झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत भारताकडे विजयी आघाडी, अभिषेक शर्माच्या 3 विकेट; कोणी फिरवली मॅच?


मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये यजमानांचा ९० धावांनी पराभव झाला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या होत्या. भारताकडून ईशान किशन याने सर्वाधिक ८१ धावा आणि तिलक वर्माने नाबाद ६० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १७.५ ओव्हरमध्ये १२९ धावांवर ऑल आऊट झाला. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट याने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्यासोबतच तादिवानाशे मारुमनी यानेही २४ धावा करत डाव केल्या पण भारतीय गोलंदाजांसमोर कोणीही टिकू शकले नाहीत. भारताकडून अभिषेक शर्मा याने सर्वाधिक ३ विकेट तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादवने दोन-दोन विकेट नावावर केल्या. भारतीय संघाने मालिकेतील सलग दुसरा सामना जिंंकत विजयी आघाडी घेतली आहे. झिम्बाव्बे संघाला व्हाईटवॉश मिळवण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळवावाच लागणार लागेल.

आजच्या सामन्यात पहिल्यांदाच कॅप्टन श्रेयस अय्यर याने टॉस राहिला. याआधी झालेल्य सर्व सामन्यांमध्येा त्याने टॉस जिंकला होता. आज मात्र सिकंदर रझाने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सुरूवातीला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी हा निर्णय ठरवला. कारण भारताचे आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा (८ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (२० धावा) करून स्वस्तात माघारी गेले होते. आज ईशान किशन याने एकट्या डावाची सूत्रे हातात घेतल्याचं दिसून आलं. कारण पठ्ठ्याने ४४ चेंडूत ८१ धावा केल्या, अवघ्या १९ धावांसाठी त्याचे शतक पूर्ण झाले नाही. त्यासोबतच उपकर्णधार तिलक वर्मा यानेही २९ चेंडूत नाबाद ६० धावा करत भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला होता. शिवम दुबे ६ धावा आणि रिंकू सिंहने १२ धावा केल्या.
Maharashtra TimesIND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार?
या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाची दमदार सुरूवात झाली होती. भारताला पहिल्या विकेटसाठी चौथ्या ओव्हरची वाट पाहावी लागली, बेनेटला यश ठाकूरने आऊट करत झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला होत. त्यानंतर प्रिन्स यादवनेही पहिल्याच बेन कुरना आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर फक्त तादिवानाशे मारुमनी आणि ब्रॅड इव्हान्स यांच्यात २३ धावांची मोठी भागीदारी केली.
Maharashtra TimesIndia vs West Indies ODI: टीम इंडियात मोठा उलटफेर, 8 धुरंधरांचा पत्ता कटणार, श्रेयस, इशान, बुमराह आगामी सीरिज मुकणार? नेमकं कारण समोर
झिम्बाब्वे (प्लेइंग 11): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डिऑन मायर्स, सिकंदर रझा (C), रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, तादिवानाशे मारुमनी (WK), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नागारावा, ब्लेसिंग मुझारबानी

भारत (प्लेइंग 11): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, मयंक यादव

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत