Headlines

जैववैद्यकीय कचरा वाढला ; दिवसाला ९ हजार किलो कचऱ्याचे संकलन


Pune News: कचरा ही समस्या सगळ्यांनाच भेडसावणारी आहे. आणि प्रत्येक शहरात ती वाढत जातेय. पुण्यामध्ये देखील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यामध्ये जैववैद्यकीय कचरा वाढला आहे. सध्या शहरात दररोज ९ हजार ४८५ किलो इतरा कचरा तयार होत आहे.

_Pune Biomedical waste
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा .प्रतिनिधी ,पुणे :गेल्या पाच वर्षांत झालेला वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार, मध्यवर्ती शहरासह उपनगरे, समाविष्ट गावांमध्येही पसरलेली रुग्णालये, गल्लीबोळात सुरू झालेल्या पॅथॉलॉजी लॅब, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची वाढलेली संख्या आणि मेडिकल टुरिझमला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये (बायोमेडिकल वेस्ट) दुपटीने वाढ झाली आहे. शहरात सध्या दररोज सुमारे नऊ हजार ४८५ किलो जैववैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. करोना साथीपूर्वी संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत हा दुपटीहून अधिक आहे.

प्रमाण नऊ हजार किलोच्याही पुढे गेले आहे.

महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२५-२६’मध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पुण्यात कैलास स्मशानभूमी परिसरात महापालिकेचे अधिकृत समायिक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्र कार्यरतआहे. सन २०२०मध्ये शहरात दररोज तीन ते साडेतीन हजार किलो जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण होते; पण आता हे प्रमाण नऊ हजार किलोच्याही पुढे गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, प्रतिखाट दररोज २५० ते ५०० ग्रॅम कचरा निर्माण होणे अपेक्षित असते.

Maharashtra TimesNagpur News: इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना मिळाला बंगला ;नीता ठाकरे ठरल्या पहिल्या मानकरी

कचरा सातत्याने वाढतो आहे.

शहरात सध्या प्रतिखाट प्रतिदिन ३०३ ग्रॅम कचरा निर्माण होत असून; हे प्रमाण जागतिक निदर्शक मर्यादेत आहे, पण शहराचा वाढता विस्तार पाहता दैनंदिन कचऱ्यात उल्लेखनीय वाढ होते आहे. वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार व मेडिकल टुरिझम, रुग्णालांची संख्या आणि उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा ओघ, शहर आणि समाविष्ट गावांमध्ये डायग्नोस्टिक सेंटर्स, ब्लड कलेक्शन सेंटर्स आणि पॅथॉलॉजी लॅबची संख्या वाढल्याने हा कचरा सातत्याने वाढतो आहे.

Maharashtra TimesAmit Thackeray : तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले

जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण

दैनंदिन संकलित होणारा एकूण कचरा -९४८५
.ज्वलनशील कचरा -४५५८ किलो
.धारदार वस्तू – १८४ किलो
. ऑटोक्लेव्हेबल कचरा – ३,८०० किलो
. काचेचा कचरा -१४१ किलो
. प्रतिखाट दैनंदिन निर्मिती -३०३ ग्रॅम

किरण कुलकर्णी यांची प्रतिक्रिया

पुण्यातील सर्व लहान- मोठ्या पॅथेलॉजी लॅबपासून ते मिल्ट स्पेशालिस्टी हॉस्पिटलपर्यंत सगळीकडे तयार होणारा जैववैद्यकीय कचरा संकलित करुन आमच्या
केंद्रात पाठवला जातो.समाविष्ट गावांमधील कचराही येतो आहे. विस्तारलेल्या वैद्यकीय क्षेत्रामुळे या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील आठ ते दहा वर्षांच्या विचार करून आम्ही यंत्रणा विकसित केली असून, त्यामुळे कचरा वाढला, तरी विल्हेवाटीस अडथळा येणार नाही असे अशी प्रक्रिया प्रकल्प प्रमुख किरण कुलकर्णी यांनी दिली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा