ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. वाघमारेंनी मराठा समाजातील स्त्रियांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. बीडमधील मराठा बांधवांनी परळी येथील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. वाघमारेंना राज्यात कुठेच फिरू दिले जाणार नाही, असा थेट इशारा मराठा आंदोलकांनी दिला. वाघमारेंना सोडणार नाही, अशा शब्दांत मराठा बांधवांनी आपला राग व्यक्त केला. लक्ष्मण हाके व वाघमारे हे परळीच्या नेत्याचे प्रिपेड कार्ड असल्याची टीका त्यांनी केली.