Headlines

चिपळुणात भर दिवसा दोन सदनिका फोडल्या


शहरातील गोवळकोट रोडसह बायपास मार्गानजीकची घटना : एका सदनिकेतून 8 लाख 18 हजारांचा ऐवज चोरीस

चिपळूण

शहरातील गोवळकोट रोडसह बायपास मार्गानजीकच्या दोन सदनिका भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना गुऊवारी घडली. यातील एका सदनिकेतून तब्बल 8 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तर दुसऱ्या सदनिकेतून कोणताही ऐवज चोरीस गेलेला नाही. भर दिवसा झालेल्या या चोरेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतची फिर्याद नगमा अबीदअली मुजावर (40, गोवळकोट रोड) यांनी दिली आहे. 30 जुलै रोजी दुपारी 12.30 ते 1.40 वाजण्याच्या सुमारास नगमा मुजावर राहत असलेल्या सदनिकेच्या दरवाजाची कडी, कोयंडा कोणत्यातरी हत्याराने अज्ञात व्यक्तीने उचकटला. त्यानंतर दरवाजा उघडून त्याने आत प्रवेश करत बेडरुममधील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, साखळी, हार, कर्णफुले, अंगठ्या असा असा तब्बल 8 लाख 18 हजाराचा ऐवज चोरून नेला. हा चोरीचा प्रकार नगमा मुजावर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची फिर्याद चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिपळूण-गुहागर मार्गावरील बायपास रोड येथील ‘द्वारका कृष्णकुंज’ या इमारतीमध्ये धनश्री भोसले यांची सदनिकादेखील अज्ञात चोरट्यांनी फोडली. मात्र त्यातून दागिने, पैसे चोरीस गेलेले नाहीत.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत