Headlines

चालू सामन्यात यशस्वीची श्रीलंकेच्या खेळाडूला IPL खेळण्याची ऑफर अन् पुढच्या बॉलवर विकेट, Video एकदा पाहाच


Yashasvi Jaiswal Sledging Video : भारतीय संघाने यजमान श्रीलंक संघावर १६५ धावांनी विजय मिळवला. हा सामना शेवटच्या दिवसापर्यंत रंगला होता. या सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला, जयस्वालने श्रीलंकेच्या खेळाडूला IPL खेळण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर चेंडूवर गेम पालटून गेला. नेमकं काय झालं जाणून घ्या.

Yashasvi Jaiswal Sledging Video
Yashasvi Jaiswal Sledging Video(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मानव सुतारच्या अचूक फिरकीच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर १६५ धावांनी मात केली. भारताने दिलेल्या ३७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २०६ धावांत आटोपला. सुतारने पहिल्या डावात चार, तर दुसऱ्या डावात सहा विकेट मिळवून विजयात मोलाचा वाटा उचलला. मालिकेतील दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून खेळली जाईल. या सामन्यानंतर डिकवेला याची विकेट सर्वात चर्चेत राहिली. युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने त्याला स्लेजिंगच्या ट्रॅपमध्ये अडकवलं. डिकवेला पिचवर टिकून खेळत होता त्यावेळी जयस्वालने डोकं लावलं. आयपीएलमध्ये खेळण्याची ऑफर दिली आणि एक अट ठेवली. पण नंतरच्या बॉलवर तो आऊट झाला. जयस्वालने ठेवलेली नेमकी अट कोणती होती आणि मैदानात काय घडलेलं? जाणून घ्या.

प्रसिद्ध कृष्णा याचे याच्या शॉर्ट बॉल खेळताना डिकवेला काहीसा संघर्ष करताना दिसला. त्यावेळी जयस्वालने संधी साधली आणि स्लेजिंग करायला सुरूवात केली. अरे यार, पहिल्या इनिंगमध्ये खूप शॉट्स खेळत होता. आता का नाही मारतेस. यावर डिकवेलानेही त्याला उत्तर दिले, काही गरज नाही,मला आयपीएलमध्येघेऊन चल मी तिथे षटकार मारतो. यानंतर जयस्वालनेही प्रतिसाद करताना, अरे नक्की, १०० टक्के घेऊन जाणार पण एक षटकार मारून दाखव तुला आयपीएलमध्ये नेण्याचं आश्वासनच दिलं. हे सर्व झाल्यावर प्रसिद्ध कृष्णा याचा शॉर्ट बॉल खेळताना त्याचे नियंत्रण सुटलं आणि बॅटची कड घेत चेंडू कीपर पंतच्या हातात गेला आणि डिकवेला आऊट झाला. आयपीएल सोडा पण या स्लेजिंगमध्ये पडण्याच्या नादात डिकवेलाने आपली विकेट गमवली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

श्रीलंका संघाचा कीपर असलेल्या डिकवेला याने पहिल्या डावात चिवट फलंदाजी करताना ८० धावांची चिवट अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने १७ चेंडूत १० धावा करत जम बसवायला सुरूवात केली होती. पण जयस्वालच्या माइंडमध्ये तो अडकून पडला आणि आपली महत्त्वाची विकेट गमावून बसला.

Maharashtra TimesIND vs SL : कोणाच्या लक्षात आलं नाही पण श्रीलंकेच्या कर्णधाराने पराभवासाठी तिसऱ्याच खेळाडूचं घेतलं नाव, कोण आहे मॅचविनर?
गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची ४ बाद ४७ अशी स्थिती झाली होती. मात्र, कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुशा यांनी चौथ्या दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवून भारताला रोखले होते. बुधवारी म्हणजे कसोटीच्या पाचव्या दिवशी ही जोडी कधीपर्यंत मैदानात तग धरते, हे जास्त महत्त्वाचे होते. डिसिल्वा आणि दिनुशाने पाचव्या विकेटसाठी २०२ चेंडूंत ९५ धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. जाडेजाला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने डिसिल्वाला सुतारकरवी झेलबाद केले. डिसिल्वा १५१ चेंडूंत सात चौकारांसह ५९ धावा करून बाद झाला. यानंतर प्रसिध कृष्णाने निरोशन डिकवेलाचा अडसर दूर केला. दुसऱ्या बाजूने दिनुशाने सलग दुसऱ्या डावात शतकाच्या दिशेने कूच केली होती.

Maharashtra TimesDuleep Trophy Final Venue Changed : दुलीप ट्रॉफी सुरु होण्याआधीच मोठा ट्विस्ट! BCCIने फायनलचं ठरलेलं मैदान अचानक बदललं; नेमकं कारण काय?
अखेर सुतारने त्याला रोखण्यात यश मिळवले. दिनुशाने १२८ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ८४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीने श्रीलंकेला कसोटीत मधल्या फळीत एक भक्कम फलंदाज मिळाल्याचे दाखवून दिले. यानंतर सुतारने तळाच्या तिघांना बाद केले. श्रीलंकेच्या अखेरच्या तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेचे अखेरचे चार फलंदाज सात धावांत माघारी परतले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा