![]()
आशियाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी), बँकॉक (थायलंड) येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्राम २०२६’ या स्पर्धेत चांदवड येथील एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिया पांडावकर व तिच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी भारतातून केवळ १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यात एसएनजेबी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स शाखेच्या रिया पांडावकर हिने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्ण यश मिळवले. रिया आणि तिच्या गटाने ‘उत्तम आरोग्य आणि सुदृढता’ या संकल्पनेवर आधारित एक अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण संकेतस्थळ विकसित केले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, सुरक्षित घरगुती उपचार, औषधांची खरेदी आणि डॉक्टरांची वेळ आरक्षित करणे यांसारख्या सुविधा एकाच छताखाली सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करून आरोग्य क्षेत्रात बदल घडवणाऱ्या या कल्पक प्रकल्पाचे जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. या गटाला संचालक डॉ. जैन, परीक्षक डॉ. नितीन त्रिपाठी, एड्युस्किलचे परितोष यांचे मार्गदर्शन लाभले.
Source link
चांदवड:आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल इनोव्हेशन’ स्पर्धेत रिया पांडावकर व गट प्रथम
