Headlines

गोंदियातून भाजपची उमेदवारी? MLA विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे; निवडणुकीच्या तोंडावर १२ सदस्यांना दिलासा – gondia mla vinod agarwal and 12 local bjp office bearers-peoples representatives suspension revoked pri


भाजपे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे हे निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबतच निलंबित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील १२ स्थानिक भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरचेही निलंबन रद्द केले आहे.

vinod agarwal
vinod agarwal(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : गोंदियाचे तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यावर पक्षाने २०१९मध्ये केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. भाजपे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे हे निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबतच निलंबित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील १२ स्थानिक भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरचेही निलंबन रद्द केले आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेले गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने विनोद अग्रवाल यांनी नाराज होत कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. पण, पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते. मुळात गोंदिया विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कुणी अपक्ष विजयी झाले होते. नंतर महायुतीचे सरकार येताच त्यांनी भाजपशी जुळवून घेतले. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप आपल्याला उमेदवारी देणार नाही हे कळल्यावर त्यांनी घरवापसीचा निर्णय घेतला. त्यांच्या घरवापसीच्या निर्णयानंतर विनोद अग्रवाल यांचे भाजपकडून परतीचे दार पूर्णपणे उघडले होते. आता निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार अग्रवाल यांच्यासोबत भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, डॉ. अमित बुद्धे, मुनेश रहागंडळे, रामराजे रवरे, शिव शर्मा, घनश्याम पानतवने, धर्मेश अगरवाल, दीपक बोबडे, नीतू बिरिया, शैलेश सोनावणे, कमलेश ढिलारे यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.
Maharashtra TimesMaharashtra Election: सर्वत्र पक्षांतराचे वारे? उमेदवारनिश्चितीची कुणकुण लागताच आघाडी व युतीतील इच्छुक कुंपणावर
काही दिवसांपूर्वी भाजपमधील माजी आमदार गोापलदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार विनोद अग्रवाल यांची भाजपशी वाढती जवळीक यामागे असल्याचे सांगितले जात होते. आता आ. अग्रवाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे.

गोंदियातून भाजपची उमेदवारी?
आमदार विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याने गोंदिया विधानसभेतून ते भाजपचे उमेदवार राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अग्रवाल हे लवकरच चाबी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. यासाठी गाड्यांचीही बुकिंग करण्यात आल्याची माहिती आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा