Headlines

खारफुटी आणि खाडीवरून जाणार ‘ठाणे रिंग मेट्रो’, केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका| Maharashtra Times


Thane Internal Metro Project: ठाणे शहरात २९ किमी लांब वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे ५,३८० झाडं बाधित होणार आहेत. खाडी आणि कांदळवणावरून मार्ग जाणार असल्यामुळे या प्रक्लपाला विरोध होत आहे.

ठाणे रिंग मेट्रो
ठाणे: ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्पामुळे हजारो खारफुटी बाधित होणार आहेत. या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र मंजुरी प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यात १२,२०० कोटी रुपये खर्च करून अंतगर्त मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. यामुळे खारफुटी, खाडी आणि किनारा मार्ग परिसर बाधित होणार आहेत. तब्बल ६.६५७९ हेक्टर खारफुटी क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

५,३८० खारफुटी बाधित होणार

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण ठाणे जिल्ह्यात खाडी आणि खारफुटीची क्षेत्र असल्यामुळे यांच्यावर परिणाम होणार आहे. या प्रक्लपामुळे तब्बल ६.५ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ५,३८० खारफुटी बाधित होणार आहेत. पण बांधकामावेळी बाधित झालेल्या झाडांची पुनर्लागवड करण्यात येईल असेहाीया प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भरपाईच्या स्वरूपात ३७,१८४ झांडांची पुनर्लागवड करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesMumbai AC Local: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण-CSMT लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

ठाणे रिंग मेट्रोचे मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकं आणि कारशेड उभारताना काही कांदवळन बाधित होणार आहे. मेट्रो मार्गासाठी प्रवेशमार्ग आणि इतर पायाभूत सुविधा उभारताना या खारफुटीच्या क्षेत्रांना फटका बसणार असल्याचं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. ठाणे मेट्रोसाठी बांधण्यात येणाऱ्या डेपोचा आराखडा सुधारण्यात आला होता. त्यामुळे वसईच्या खाडीला लागून असलेल्या अनेक खाड्या बाधित होणार होता तो मार्ग बदलण्यात येणार आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. बाधित झालेल्या खारफुटींच्या तिप्पट झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

कसा असेल मेट्रो मार्ग?

ठाणे शहरात २९.१ किलोमीटर लांब मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गावर २२ स्थानकं प्रस्तावित आहेत. त्यापैकी २० स्थानकं उन्नत आणि २ स्थानकं भूमिगत असतील. तसेच, १८ हेक्टर क्षेत्रावर डेपो बांधण्यात येणार आहे. या मेट्रो मार्गावर २०२९ पर्यंत ६.४७ लाख प्रवासी संख्या असण्याची शक्यता आहे. २०३५ पर्यंत ही संख्या ७.६१ लाख आणि २०४५ पर्यंत ८.७२ लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesMumbai Metro 5: ठाणे-भिवंडी-उल्हासनगरपर्यंत जोडणार मेट्रो लाइन ५, तीन टप्पे, डेपोच्या कामांना वेग; पहिला टप्पा लवकरच पूर्ण

ठाणे शहरात वाघबीळ, डोंगरीपाडा, मानपाडा, गांधीनगर, रायलादेवी, ठाणे रेल्वे स्थानक, साकेत, कोळशेत, पाटीलपाडा या भागांना जोडणार आहे. दरम्यान, ठाण्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प मेट्रो मार्गिका ४ आणि ५ या दोन्ही मार्गांवरून जात असून जिथे खरचं गरज आहे तिथे कनेक्टिव्हिटी निर्माण होत नाही आहे असे आरोप केले जात आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामधील तब्ब्ल २७ लाखांहून अधिक नागरिकांना या प्रकल्पाचा काहीच फायदा होणार नाही आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा