खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची वरिष्ठांकडे तक्रार; रूपाली ठोंबरे पुणे पोलिसांवर भडकल्या – ashok kharat case rupali thombre hits back against rupali chakankar s complaint
खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची वरिष्ठांकडे तक्रार; रूपाली ठोंबरे पुणे पोलिसांवर भडकल्या – ashok kharat case rupali thombre hits back against rupali chakankar s complaint
भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. यानंतर आता चाकणकरांची बदनामी झाल्याप्रकरणी तब्बल १९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्याही नावाचा यात समावेश आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. तसेच पुणे पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे का, अशा शब्दांत ठोंबरेंनी संताप व्यक्त केला. याशिवाय चाकणकरांविरोधात वरिष्ठांकडे देखील तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.