Shapoor Zadran Death News : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं वयाच्या ३८व्या वर्षी निधन झालं. HLH या दुर्मिळ आजाराशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपुरी ठरली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अफगाणिस्तान क्रिकेटमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं मंगळवारी (७ जुलै) निधन झालं. तो फक्त ३८ वर्षांचा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो HLH (हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होता. दिल्लीतील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्याची झुंज अपुरी ठरली.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली माहिती
शापूरच्या निधनाची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. बोर्डाने शोक व्यक्त करत, अफगाणिस्तान क्रिकेट उभं करण्यात शापूरचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं. त्याची जिद्द, मेहनत आणि खेळावरील प्रेम कायम लक्षात राहील, अशा शब्दांत बोर्डाने श्रद्धांजली वाहिली.
दिल्लीत राशिद खान मोहम्मद नबी यांनी घेतलेली भेट
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शापूरची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीत उपचार सुरू असताना राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनीही रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली होती. पण अखेर त्याची मृत्यूशी सुरू असलेली लढाई संपली. शापूर जदरान हा अफगाणिस्तानच्या पहिल्या पिढीतील स्टार क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणारा चेहरा होता. २०१२ च्या टी-२० विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध दमदार गोलंदाजी करत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दोघांनाही बाद केलं होतं. त्या सामन्यात त्याने चार षटकांत ३३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध आज तिसरा टी-20 सामना, श्रेयस बाहेर काढणार हुकमी एक्का; संभाव्य भारतीय प्लेइंग 11 जाणून घ्या
क्रिकेट विश्वात हळहळ
शापूरच्या निधनाची बातमी समोर येताच क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली. अफगाणिस्तान क्रिकेटच्या सुरुवातीच्या यशात त्याचं योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
शापूरची कारकीर्द
शापूरने अफगाणिस्तानकडून ४४ वनडे आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने अनुक्रमे ४३ आणि ३७ विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव कायम घेतलं जाईल.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा