कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. रायगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी तिसरी मुंबई या नियोजित प्रकल्पावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसंच खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचं नाव घेत देखील निशाणा साधला.