Headlines

कोकण रेल्वेवर परतीचा प्रवास रखडला; मडगाव, तेजस, कोकणकन्या एक्सप्रेसवर परिणाम, 4-5 तास विलंब| Maharashtra Times


Konkan Railway Timetable: परतीच्या प्रवासातही कोकण रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला असून त्याचा परिणाम एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकावर होत आहे.

कोकण रेल्वे रखडली
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर माणगाव इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक एक्स्प्रेस उशिरा धावत असल्याने प्रवाशांना ताटकळत रहावे लागत आहे. सुट्टी संपवून मुंबईकडे परतणाऱ्यांचा प्रवास त्यामुळे रखडत होत आहे.

एलटीटी मडगाव, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या मांडवी एक्सप्रेस या महत्त्वाच्या रेल्वे तब्बल चार ते पाच तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. त्यातच गाड्यांच्या उशिरा धावण्याची कारणेही कोकण रेल्वे प्रशासनकडून सांगितले जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे प्रवासी अजित भोगटे यांनी सांगितले.

Maharashtra TimesKonkan Railwayवरील गाड्यांच्या वेळा बदलणार; मान्सून वेळापत्रक जाहीर, मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक एक्सप्रेसवर परिणाम

मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामं

कोकण रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणा मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. यामुळे रेल्वेचा वेग मंदावला आहे. ह्याचाच परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताना मुंबईच्या दिशेने परत येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या कामांमध्ये कटिंग आणि लोअरिंग, बॅलेस्टलेस रुळांची दुरुस्ती, ट्रॅक लिफ्टिंग, सखोल स्क्रीनिंग, रुळांचं नूतनीकरण आणि ट्रॅक टाकण्याच्या मशीनची देखभाल यांचा समावेश आहे.

रेल्वे रुळांची देखभाल, प्रवाशांची सुरक्षा आणि आरामदायी सुनिश्चित करण्यासाठी ही कामं महत्त्वाची आहेत. कोकण रेल्वे मार्गावर या सर्व कामांची आणि व्यवस्थापनाची गरज असल्याची कोकण रेल्वे विभागाने माहिती आहे. कोकण रेल्वेचा मार्ग डोंगराळ भागातून जातो. या परिसरात मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे मान्सूनपूर्वी रेल्वे रुळांची तपासणी आणि उपाययोजना करणे आवश्यक आहेत. ही कामं सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी रेल्वेचा वेग तात्पुरता मंदावला आहे.

Maharashtra TimesKonkan Railway: कोकणवासियांचा परतीचा प्रवासही त्रासाचा; गाड्या दादर-ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार, कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नामकरण

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाला माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वेच्या विकासात मंधु दंडवटे यांचं मोठं योगदान होतं. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाचं नामकरण ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनल’ असं करण्यात येईल. कोकण विकास समितीने सुमारे पाच वर्षांपासून हा प्रस्ताव मांडला असून त्याचा पाठपुरावा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मार्च 2021पासून यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा