Headlines

कोकण-पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार; जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी NHAIकडून हालचाली सुरू| Maharashtra Times


Jaigad-Chiplun-Satara Highway: कोकण ते पश्चिम महाराष्ट्रात अंतर आता कमी होणार आहे. जयगड बंदरापासून साताऱ्यापर्यंत द्रुतगती महामार्ग बांधण्यासठी सरकराने हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.

जयगड ते सातारा महामार्ग
रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करण्यासाठी आता एका नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( NHAI ) हा मार्ग उभारणार आहे. यामुळे कोकणातील किनारी मार्गावरील प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी सुधारणार आहे.

एका तासांत प्रवास होणार

NHAIने या प्रकल्पावर काम सुरू केलं आहे. मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या निविदा १८ ऑगस्ट रोजी उघडल्या जातील. या प्रकल्प अहवालानंतर मार्गाला मंजुरी मिळून काम सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ९,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जयगड बंदर ते सातारादरम्यान प्रवासाचा वेळ पाच तासांवरून केवळ एका तासावर येण्याची शक्यता आहे. या नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासासह अवजड औद्योगिक वाहतुकीसाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

Maharashtra TimesTeen Hath Naka: ठाण्यात तीन हात नाक्यावरील कोंडी फुटणार, २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दीड वर्षात पूर्ण होणार

कोकण किनारपट्टीवरील बंदरे आणि अंतर्गत व्यापार केंद्रांमध्ये थेट संपर्क सुधारण्यासाठी हा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. या महामार्गासाठी पश्चिम घाटात बोगदे आणि उन्नत पूल बांधून मार्ग तयार करण्यात येणार आहेत. सध्या राज्यातून जयगड बंदरापर्यंत जाणाऱ्या औद्योगिक वाहनांना नागरी मार्ग, घाटातील धोकादायक वळणांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. पण या मार्गामुळे थेट प्रवास शक्य होणार आहे. हा पूर्णपणे ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग असेल.

कुठून-कुठे जोडणार?

हा महामार्ग तब्बल ९८ किमी लांब असेल. राष्ट्रीय महामार्गा ४८ही या महामार्गाशी जोडण्याची नियोजन आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक सहजपणे कोकणात प्रवास करू शकतात. यामुळे कोकण आणि सह्याद्री परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घाटातून माल नेताना वाहनचालकांना सावध होऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात घाटात दरडी कोसळण्याची भीती मोठी असते. पण नव्या मार्गामुळे प्रवासाचा अधिक सुरक्षित मार्ग मिळणार होणार आहे.

Maharashtra TimesPune News: ‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता मार्ग’ १२ ठिकाणी आमनेसामने, पुण्यात प्रकल्पांचा तिढा; मेट्रो आराखड्यात बदलाची शक्यता

जयगड-सातारा द्रुतगती महामार्गाला प्रस्तावित पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्ग आणि पुणे-बंगळुरू महामार्गाशी जोडण्याचीही योजना आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर लॉजिस्टिक पार्क वेअरहाउसिंग आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना जयगड बंदरांशी थेट जोडल्यामुळे उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक पर्यायी मार्ग मिळू शकतो. पुणे महानगर प्रदेशासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा