Zandu Kumar won the bronze medal : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताला पहिले पदक बिहारच्या झंडू कुमार याने पहिले पदक जिंकून दिले. भाजी विकणे, ई रिक्षा चालवण्यापासून ते पदक जिंकण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने आज पहिले पदक जिंकले. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये बिहारच्या झंडू कुमार याने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील हरनौत गावच्या या सुपुत्राने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पदक जिंकल्यावर सगळे कौतुक करत होते, पण त्याआधीचा संघर्ष शब्दात मांडता येईल असा नव्हता. भाजी विकली, ई-रिक्षा चालवली आणि आपले प्रयत्न सुरू ठेवले. आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. देशासाठी मिळवले पदक कोणतेही असो, त्याचा सन्मान केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? या खेळाडूचे नाव झंडू नव्हते, वेगळेच होते. मग त्याला ‘झंडू’ नाव कसे पडले याबत त्याच्या आई कमला देवी यांनी माहिती दिली आहे.
झंडू कुमारचा संपूर्ण प्रवास
झंडू कुमार पाच वर्षांचा असताना पोलिओमुळे शारीरिकदृष्ट्या कमजोर झाला. पण त्याने हार मानली नाही, आपल्या कमजोरीला आड येऊ दिले नाही. सकाळी मार्केटमधून भाजी आणून ती विकायचा आणि संध्याकाळी चार वाजता ट्रेनिंगसाठी जायचा. कोच गौतम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तो मेहनत घेत होता. भाजीमधून त्याला फारसे पैसे मिळत नव्हते. ४०० ते ५०० रुपये मिळत होते, पण प्रोटीनसाठी त्याला १००० रुपये लागायचे. भाजीचा व्यवसाय आणि प्रशिक्षण यांची सांगड घालताना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती.
२०२१ मध्ये कोरोनाच्या काळात, जिथे ते अनेक वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करत होते तिथे ओव्हरब्रिज झाल्यामुळे त्यांचे दुकान कायमचे बंद झाले. हार मानेल तो झंडू कसला! त्याने ई-रिक्षा चालवली आणि त्यातून पैसे कमवून उदरनिर्वाह करू लागला. परंतु दोन वर्षांनी म्हणजेच २०२३ मध्ये त्याने तीच रिक्षा विकली. कारण त्याला दिल्लीमधील राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा होता. यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी रिक्षा विकण्याचा त्याचा निर्णय फसला. त्याचा एकही प्रयत्न सुरुवातीला यशस्वी झाला नाही. पण म्हणतात ना, केलेले कधीच वाया जात नाही. तो हरला तरी त्याच्यातील टॅलेंट पॉवरलिफ्टिंग कोच राजिंदर सिंह यांनी ओळखले. झंडूला त्यांनी गांधीनगरमधील SAI च्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले. हा त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्याच वर्षी दिल्लीमध्ये आयोजित खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये त्याने रौप्य पदक पटकावले. ७२ किलो गटात खेळताना २०६ किलो वजन उचलत त्याने नॅशनल रेकॉर्ड नावावर केला. त्यानंतर बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १९१ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकून तो कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र झाला. Commonwealth Games 2026 भारताचे संपूर्ण वेळापत्रक, नीरज चोप्रा, मीराबाई यांच्याकडून पदकाची अपेक्षा; क्रिकेट, कुस्ती, हॉकी आणि बॅडमिंटन का वगळलं?
झुन्नूचा ‘झंडू’ कसा झाला?
झंडूची आई कमला देवी म्हणाल्या, “झंडूचे खरे नाव झुन्नू आहे, पण नंतर सगळे त्याला झंडू म्हणू लागले.” पदक जिंकल्यावर त्याच्या भावाने सांगितले की, दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात गेल्यावर लोकांनी त्यांना थांबवून अभिनंदन केले. जे आधी झंडूला ‘झंडूवा’ म्हणायचे तेच आता ‘झंडू जी’ म्हणत होते.दरम्यान, ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ अशी एक हिंदी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच झंडू कुमार याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा