Kareena Kapoor Khan and Prithviraj Sukumaran Daayra Movie Trailer:करिना कपूर खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या दायरा या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर समोर आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या दायरा या सिनेमाची चर्चा सुरू होती. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. मेघना गुलजार दिग्दर्शित बहुप्रतीक्षित क्राइम-थ्रिलर चित्रपट ‘दायरा’ चा हा अंगावर काटा आणणारा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या चित्रपटातून बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.
काय आहे ‘दायरा’च्या ट्रेलरमध्ये?
सुमारे २ मिनिटे १९ सेकंदांचा हा ट्रेलर सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. एका भीषण घटनेनंतर हरवलेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या एका हवालदिल आईच्या दृश्यानं ट्रेलरची सुरुवात होते. चित्रपटात करिना कपूर (DCP अजूनी कोहली) आणि पृथ्वीराज सुकुमारन (DCP रमण कुमार) हे दोघेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
तर सिनेमात काही मराठी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या ट्रेलरमध्ये क्षिती जोग आणि जितेंद्र जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचं लक्षात येतंय.
मेघना गुलजार यांनी याआधी ‘तलवार’, ‘राझी’, ‘सॅम माणेकशॉ’ यांसा’रख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानं आता त्यांच्या या दायरा सिनेमाबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.जंगली पिक्चर्स आणि पेन स्टुडिओजनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.
‘कायदा विरुद्ध न्याय’ या प्रश्नावर विचार करायला भाग पाडणारा हा करिना आणि पृथ्वीराज यांचा सिनेमा येत्या १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
करिष्मानंतर करिनाही पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी करिष्मा कपूर हिनं ब्राऊन वेब सीरिजमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता करिनाही पोलिस अधिकारी साकारताना दिसणार आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा