IND W vs ENG W Test News : महिला भारत वि. महिला इंग्लंड संघामध्ये कसोटी सामना सुरू आहे. आज पहिला दिवस झाला असून डाव संपल्यावर सामन्याचा संपूर्ण आढावा आणि पहिल्या दिवशी कोणी वर्चस्व राखले? सविस्तर जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शुक्रवारी भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटीला सुरुवात केली. १४२ वर्षांनंतर प्रथमच महिला कसोटी सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडने टॉस जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या दिवशी भारत ७४.५ ओव्हरमध्ये २८५ धावांवर ऑल आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी २१-१ धावा केल्या होत्या. अद्यापही भारताच्या संघाकडे २६४ धावांची आघाडी आहे.
भारताचा डाव
सलामीला आलेल्या शेफाली वर्माला पहिल्याच षटकात माघारी परतली. यास्तिका भाटियाही फार काही वेळ मैदानावर टिकली नाही. संकटाच्या काळात स्मृती मंधानाने आघाडी घेतली आणि ५० चेंडूत अर्धशतक ठोकून संघाला दिलासा दिला. मंधानाने १०८ चेंडू खेळून ८३ धावा केल्या. तिने ११ चौकार आणि एक षटकार लगावला, मात्र तिची शतक करण्याची संधी हुकली. कर्णधार हरमनप्रीत कौरने संयमी खेळ करत १०३ चेंडूत ५१ धावा जमवल्या. दीप्ती शर्माने देखील अर्धशतक झळकावत मधल्या फळीला बळ दिले. याशिवाय जेमिमाने ३५, ऋचाने १३ आणि स्नेहाने १३ धावा करून धावसंख्येला हातभार लावला. Rohit Shrama : अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच! इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा कोकणच्या सुपूत्राकडून सराव, पठ्ठ्याची शेवटी एक मागणी इंग्लंड संघ बॅटिंगला उतरल्यावर चौथ्या ओव्हरमध्येच क्रांती गौडने पहिला धक्का दिला. टॅमी ब्यूमंटला २ धावांवर माघारी पाठवले. क्रांतीचा स्पेल एकदम खरतनाक होता, कारण तिने ५ ओव्हरमध्ये दोन मेडन ओव्हर टाकत ८ धावा देत एक विकेट नावावर केली. आणखीन एक विकेट घेतल्यात जमा होती पण डीआरएस न घेतल्यामुळे भारताची संधी हुकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटीत झालेल्या पराभवानंतर भारताला या सामन्यात पुनरागमन करायचे आहे. लॉर्ड्ससारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मिळालेली ही संधी संघाला आत्मविश्वास देणारी आहे. आता पहिल्या डावात उभारलेल्या 285 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Team India : वैभव सूर्यवंशीवरुन निवडकर्त्यांना सुनावलं, भावनिक होऊन निर्णय घेतला; माजी क्रिकेटर रोखठोक बोलला भारतीय महिला संघ (प्लेइंग 1): स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (C), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (WK), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायली सतघरे, श्री चरणी, क्रांती गौड
इंग्लंड महिला संघ (प्लेइंग 11): टॅमी ब्यूमंट, माया बुशियर, हेदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (C), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (WK), मॅडी व्हिलियर्स, सोफी एक्लेस्टोन, इझी वोंग, लॉरेन बेल, लॉरेन फायलर
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा