Headlines

वैभव सूर्यवंशीवरुन निवडकर्त्यांना सुनावलं, भावनिक होऊन निर्णय घेतला; माजी क्रिकेटर रोखठोक बोलला


मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ चा थरार संपला आणि टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं! पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण विश्वचषकानंतर टीम इंडियामध्ये मोठे आणि धक्कादायक फेरबदल पाहायला मिळालेत. ज्या सूर्यकुमार यादवने आपल्या कॅप्टन्सीत भारताला चॅम्पियन बनवलं, त्यालाच संघातून थेट डच्चू देण्यात आला! सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरची संघात एन्ट्री झाली, त्याच्याकडे थेट कॅप्टन्सीची धुरा सोपवण्यात आली.

दुसरीकडे, संघात एका नव्या पोराची एन्ट्री झाली, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभवला बॅकअप ओपनर म्हणून संघात स्थान मिळालं. पण, खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा टी२० वर्ल्डकपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनला अवघ्या ३ मॅचेसनंतर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. संजूला डच्चू देऊन भावनेच्या भरात वैभव सूर्यवंशीला संधी दिली खरी, पण हा पत्ता पूर्णपणे फेल ठरला. वैभव पदार्पणाच्या तिन्ही मॅचेसमध्ये फ्लॉप ठरला आणि टीम इंडियालाही लागोपाठ पराभवाचे धक्के बसत आहेत.

Maharashtra TimesPM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, बिग बॅश क्रिकेट लीगचा पहिला सामना भारतात, कधी आणि कुठे होणार?

या संपूर्ण वादावर आता भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी ‘जिओस्टार’च्या एका शोमध्ये रोखठोक भाष्य केलंय.

“नेहमी संजू सॅमसनचाच बळी का?”

संजू सॅमसनला बाहेर करण्याच्या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर पार्थिव पटेलने जोरदार टीका केली आहे. पार्थिव म्हणाला की, “नेहमी संजू सॅमसनलाच का टार्गेट केलं जातं? गेल्या ११-१२ वर्षांतील संजूच्या करिअरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर कन्सिस्टन्सी हा एकच प्रश्न नेहमी त्याच्या मागे लागला आहे. १२ वर्षांच्या आयपीएल करिअरमध्ये फक्त एकच सीझन असा गेलाय, ज्यात त्याने ५०० पेक्षा जास्त रन्स केलेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही त्याची तीच कथा आहे; तो एकतर खूप भारी खेळतो किंवा पार फ्लॉप होतो. जेव्हा सिलेक्शनची वेळ येते, तेव्हा हाच मुद्दा त्याच्या आडवा येतो.”

पार्थिवने उडवला धुरळा

पार्थिवने संघ निवडीच्या पद्धतीवरच थेट बोट ठेवलंय. त्याच्या मते, तुम्ही भावना आणि लॉजिक या दोन्ही गोष्टींची खिचडी करून निर्णय घेऊ शकत नाही. पार्थिवने स्पष्ट सांगितलं की, “भावनेच्या भरात तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देणं एकवेळ योग्य वाटू शकतं. पण जर लॉजिकने विचार केला, तर संजू सॅमसनला बाहेर बसवण्याचं कारण काय? त्यामुळे संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय निव्वळ भावनेच्या भरात घेतलेला दिसतोय.”

“वैभवकडे गमावण्यासारखं काहीच नाही”

तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी लागोपाठ फेल होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना अभिषेक नायरने मात्र एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला. नायरच्या मते, जगातील टॉप बॉलर्ससमोर खेळताना वैभवसारख्या नवख्या पोरावर कोणताही प्रेशर नसतो.

Maharashtra Times‘तू मला लाईक करतोस’ म्हणत चाहतीने श्रेयसला अडवलं; मागे उभ्या वैभवने जे केलं त्याचीच चर्चा

अभिषेक नायर म्हणाला, “समोर जसप्रीत बुमराह किंवा जोफ्रा आर्चरसारखे दिग्गज बॉलर्स असले, तरी खरा प्रेशर हा त्या बॉलर्सवरच असतो, नवख्या खेळाडूवर नाही. कारण वैभवसारख्या युवा खेळाडूकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. जर वैभव बुमराहच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला, तर कोणीही त्याला दोष देणार नाही. पण बुमराहसारख्या बॉलरला नक्कीच भीती असते, कारण समोर असा पोरगा आहे जो पहिल्याच बॉलवर सिक्स मारताना मागेपुढे पाहत नाही.”

मोठ्या नावांना असते प्रतिष्ठेची भीती!

नायरने पुढे सांगितलं की, इंटरनॅशनल लेव्हलवर नाव कमावलेल्या बॉलर्सना आपल्या इभ्रतीची जास्त काळजी असते. जर एखादा नवखा मुलगा बुमराहला सिक्स मारतो, तर त्या मुलाचा भाव वधारतो आणि बॉलरची पत घसरते. उलट जर बॉलरने त्याला आऊट केलं, तर लोक म्हणतात की ‘तो तर अजून लहान मुलगा आहे, त्यात काय मोठं!’

त्यामुळेच सुरुवातीला एक तरुण खेळाडू पूर्ण बिनधास्तपणे आणि मोकळेपणाने खेळतो. पण तो जितका जास्त खेळत जाईल आणि नाव कमवेल, तितक्या लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. आणि एकदा अपेक्षांचं ओझं डोक्यावर आलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर तोच परफॉर्मन्स टिकवून ठेवणं भल्याभल्यांना कठीण जातं, असं नायरने स्पष्ट केलं.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत