Headlines

एसटी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे; आधी टोकन, मग कार्डसाठी रांगा, महिला-ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक| Maharashtra Times


NCMC Smart Card: १ ऑगस्टपासून एसटी प्रवाशांना सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड असणं बंधणकारक असणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपूर्वी कार्ड मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज केंद्रांवर हेलपाटे मारेवे लागत आहेत.

एसटी एनसीएमसी कार्ड
महेश चेमटे, मुंबई: ‘एसटीचे एनसीएमसी कार्ड (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड)घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे. आधी टोकनसाठी रांग, त्यातही केवळ १०० प्रवाशांचा टोकन. त्या दिवशी नंबर आला नाही तर दुसऱ्या दिवशी नव्याने रांग लावायची. टोकन मिळाल्यावर पुन्हा कार्डसाठी रांग. हाच का महामंडळाचा प्रवासीस्नेही उपक्रम?’ हा त्रागा आहे मुंबई सेंट्रल येथील प्रवासी नीलम वारजे यांचा.

१ ऑगस्टपासून कार्ड अनिवार्य

एसटी प्रवासातील सवलतीसाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टिहीन आणि दिव्यांग प्रवाशांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक आहे. १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार असल्याने कार्ड वितरण केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुविधेच्या नावाखाली प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesMumbai Local: महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

मुंबई सेंट्रल आगारात एनसीएमसी कार्डचे टोकन घेण्यासाठी नीलम शिर्के यांनी पहाटे ५.३० वाजताच रांग लावली. तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर सकाळी ८.३० वाजता त्यांना टोकन मिळाले. मात्र, कार्ड लगेच मिळेल, अशी अपेक्षा असताना त्यांना आता कार्ड घेण्यासाठी तब्बल महिनाभरानेे पुन्हा येण्यास सांगण्यात आले. परळ आगारातही गेल्या आठवड्यापासून एनसीएमसी कार्डासाठी फेऱ्या मारणाऱ्या वंदना सावंत यांना रोजच्या कामावर पाणी सोडावे लागत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच कार्डासाठी नोंदणी आणि वितरण केले जाते.‘मी घरकाम करते. काम सोडून रोज रांगेत उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे कार्डासाठी धावपळ करताना रोजच्या कमाईवर पाणी सोडावेे लागते,’ अशी व्यथा त्यांनी मांडली.

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी प्रकल्पाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असला, तरी कार्ड मिळवण्याची प्रक्रिया प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कार्डसाठी प्रवाशांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असेल, योजनेचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( सर्व आकडे २८ जुलैपर्यंतचे आहेत.)

वर्ग नोंदणी सक्रिय कार्ड
महिला ६३,५६,९५६ ३६,५७,१०३
ज्येष्ठ नागरिक ८,८१,३०४ ६,०६,२५८
अमृत ज्येष्ठ नागरिक १२,७६,२०८ ८,८५,४४५
अन्य १,४१,२६२ ८८,०७८

‘एनसीएमसी’साठी गर्दी टाळा

सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आल्याने स्वारगेट आणि वाकडेवाडी बसस्थानकांवरील कार्ड नोंदणी केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी एकच खिडकी असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी बसस्थानकांवर येण्याऐवजी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शहरांतील ५२ अधिकृत नोंदणी केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) केले आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर ‘एनसीएमसी’ कार्ड काढण्यासाठी बसस्थानकांवर गर्दी होत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी प्रतीक्षा वाढत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील विविध भागांमध्ये अधिकृत एजन्सीमार्फत कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ५२ अधिकृत केंद्रांवर ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे, तर संपूर्ण जिल्हा व एसटी स्थानक मिळून १७५ केंद्रे आहेत. नागरिकांनी आपल्या घराजवळील केंद्रावर जाऊन कार्ड काढल्यास बसस्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि नोंदणीची प्रक्रियाही अधिक जलद होईल. एसटी प्रशासनाने नागरिकांना विनाकारण स्वारगेट किंवा वाकडेवाडी बसस्थानकांवर गर्दी न करता, जवळच्या अधिकृत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा