![]()
बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी यंदा भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. प्रशासनाच्या उशिरा झालेल्या नियोजन, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांसाठी भाविकांना मोठा मनस्ताप
.
मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक माहितीनुसार यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे १ लाख भाविकांनी दर्शन घेतले. मागील वर्षी याच दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गाभाऱ्यातून दर्शनाचा लाभ घेतला होता. त्यामुळे यंदा जवळपास ६० टक्क्यांनी संख्या कमी झाली.
या श्रावणी सोमवारी जास्त गर्दी नसल्याने भाविकांना तासाभरात दर्शन मिळत होते. मागील वर्षी प्रशासन आणि ट्रस्ट यांच्या समन्वयामुळे एका मिनिटाला ८० भाविकांना दर्शन मिळत होते. भाविक रांगेत न थांबताच गाभाऱ्यातून बाहेर पडत होते. यंदा मात्र वाहनतळ आणि रांगेच्या व्यवस्थेअभावी अनेक भाविकांना वाहन लावण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
ट्रस्टकडून मंदिराच्या अधिकृत वेळेबाबत स्वतंत्र प्रसिद्धिपत्रक देण्यात आले नाही. आरो फिल्टर पाण्याची व्यवस्था मंदिर देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आली होती. फराळाची बाहेर भाविकांकडून मर्यादित व्यवस्था करण्यात आली. पहिला श्रावणी सोमवार असल्याने औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर या तिन्ही ज्योतिर्लिंगांवर गर्दी होणे अपेक्षित होते. मात्र घृष्णेश्वर परिसरात यंदा उलाढाल घटली. याला बेलफूल दुकाने बंदचा फटका बसला. पहिल्यांदाच संपूर्ण मंदिर परिसर नो व्हेइकल झोन करण्यात आला. त्याचा फटका केवळ भाविकांनाच नाही तर खुलताबाद, संभाजीनगर आणि फुलंब्रीकडे जाणाऱ्या नागरिकांनाही बसला. नियोजन बैठका श्रावण सुरू झाल्यानंतरही सुरू होत्या. त्यामुळे वाहनतळ, स्वच्छता आणि मार्गदर्शन फलकांची कमतरता राहिली. अनेक भाविकांना वाहनतळ नसल्याने रस्त्यावरच मुक्काम करावा लागला. भोसले चौक ते वेरूळ लेणी महावीर चौक हा संपूर्ण परिसर नो व्हेइकल झोन घोषित करण्यात आला. गर्दी व्यवस्थापनासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. ट्रस्टकडून गाभाऱ्यात अभिषेक बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली. विशेष दर्शन पासची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था यंदा करण्यात आली नव्हती, परंतु राजशिष्टाचार व अधिकाऱ्यांच्या नियंत्रणेत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येत होता. नेहमीच्या प्रथेनुसार पहाटे ४ पासून रात्री १२ पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. व्यापारी संघटन म्हणाले, “नो व्हेइकल झोन आणि पार्किंग नसल्याने बाहेरून येणाऱ्या टेम्पो, ट्रॅव्हल्स रस्त्यावरच थांबल्या. भाविकांना मुक्काम आणि स्वयंपाकासाठी अडचण झाली. त्यामुळे पूजा साहित्य, फुले, प्रसाद, हॉटेल्स आणि पार्किंगमधून होणारी उलाढाल ५० टक्क्यांहून अधिक घटली. मागील वर्षी या एका दिवसात लाखोंची उलाढाल होत होती. स्थानिक रोजगारांना आंदोलन करावे लागले. प्रशासनाची भूमिका याबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी नो व्हेइकल झोन आणि बॅरिकेडिंगचा निर्णय घेण्यात आला होता. श्रावणात अजून तीन सोमवार शिल्लक आहेत. भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा दे णे गरजेचे आहे.
