Headlines

‘एक नाही तर 100 गुन्हे दाखल करा, पण…’:शाळांमधील सुविधा द्या, सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा




राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था व अडचणी दाखवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत. अडचणी दाखवून देण्यामुळे गुन्हा दाखल केला जात असेल तर एक नाही तर १०० गुन्हे दाखल करा, पण शाळा नीट करुन विद्यार्थ्यांना सुविधा द्या, अशी विंनती वजा इशारा कॉक्रोज जनतापार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. २९ शासनाला दिला आहे. हिंगोली तालुक्यातील लोहगाव, करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी दिपके यांनी शाळेतील वर्गखोल्या, बसण्यासाठी बेंच, पिण्याचे पाणी, मध्यान्ह भोजन योजनेचे मसाला पदार्थ याची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी शाळेतील गैरसोयींचा पाढाच वाचला. यावेळी दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन व प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. त्यासाठी सर्व शाळांची पाहणी केली जात आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाही, स्वच्छगृहाची दुरावस्था झाली आहे, मध्यान्ह भोजन योजनेत अन्न शिजविण्यासाठी वापरले जाणारे मसाले पदार्थांची मुदत संपली आहे. एकीकडे अधिकारी अन लोकप्रतिनिधींची मुले वातानुकुलीत शाळेत शिक्षण घेत आहेत तर दुसरीकडे सर्व सामान्यांचे मुले खराब वर्ग खोल्या असलेल्या शाळांमध्ये शिकत आहे हे दुर्देव आहे. शाळेच्या पाहणीनंतर गुन्हा दाखल झाल्याच्या प्रश्‍नावर बोलतांना ते म्हणाले की, शाळांना भेट देऊन त्या ठिकाणीच्या गैरसोयी, अडचणी दाखवून देणे गुन्हा आहे काय, असे असेल तर एक नाही शंभर गुन्हे दाखल करा पण शाळा नीट कराव्यात अशी सरकारला विनंती आहे. आदिवासी विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी आंदोलन करीत आहेत सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील ग्रामीण भागातील मुलांमध्येही गुणवत्ता आहे. मात्र त्यांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसल्याचे शाळा भेटीत दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने मुंबई पुणे सारख्या जिल्हयातील खाजगी शाळाप्रमाणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोहगाव शाळेत पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट देऊन त्यांनी वर्ग खोल्या, आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी याची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी तुम्ही येणार असल्याने जारचे शुद्ध पाणी आणल्याचे सांगत शाळा प्रशासनाचा भांडाफोड केला. यावेळी दिपके यांनी पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी केली. यामध्ये दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. हेही वाचा.. मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू: म्हणाले- सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही; इथं तोडगा निघाला नाही तर मुंबई गाठणार! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत