Headlines

एक द्विशतक, शेवटच्या वनडेमध्ये वादळी शतक तरीही प्लेइंग 11 मध्ये जागा नाहीच, मॅचविनर खेळाडू बाहेर; नेमका कोण?


मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पार पडत असून भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे संघात परतले आहेत. मात्र आजच्या प्लेइंग ११ मध्ये स्टार खेळाडू ज्याला मागील सामन्यात शतक ठोकूनही जागा मिळाली नाही. कोण आहे तो मॅचविनर खेळाडू जाणून घ्या.

भारताकडून आज मॅचविनर खेळाडू असलेल्या ईशान किशन याला संधी मिळाली नाही. ईशानने शेवटच्या वनडे सामन्यामध्ये वादळी शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेतही त्याने ५ सामन्यात १२२ धावा केल्या होत्या. मात्र तरीही त्याला आजच्या सामन्यात संधी मिळाली नाही. याचं कारण म्हणजे संघात आता विराट कोहली परतला आहे, त्यासोबतच मिडल ऑर्डरमध्ये के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर असल्याने ईशानला संधी मिळाली नाही.
Maharashtra TimesTeam India : ‘ही टीम इंडिया नाही, मुंबईची टीम’; इंग्लंड विरुद्ध 4-0 ने व्हाईट वॉशनंतर माजी दिग्गजाने काढले वाभाडे; थेट नावेच मोजली
ईशान किशन याने शेवटच्या वनडे सामन्यामध्ये ७९ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती. यामध्ये किशनने १४ चौकार आणि ७ षटकार मारले होते. अफगाणिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ही वादळी खेळी केली होती. भारतीय संघ व्यवस्थापनासाठी आता डोकेदुखी होणार आहे. कारण आधीच रोहित खेळत असल्याने यशस्वी जयस्वाल याला जागा मिळत नाहीये.
Maharashtra TimesIND vs ENG Playing 11 : पहिल्या वनडेत भारताच्या त्रिमुर्तींचे कमबॅक, इंग्लंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी?
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू जसप्रित बुमराह ९६८ दिवसांनी कमबॅक करत आहे. बुमराहसोबत दोन प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली आहे. स्पिनर्समध्ये अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. दोघेही अष्टपैलू खेळाडू असल्याने बॅटिंगची खोली वाढवण्याचा प्रयत्न असावा. त्यामुळे कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली नाही.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI Playing 11 : भारत-इंग्लंड पहिला वनडे, रो-को इन, प्लेइंग 11 मध्ये मोठा मॅचविनर बाहेर! मॅच कुठे-किती वाजता?
इंग्लंड संघ (प्लेइंग 11) : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (C), जोस बटलर (WK), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टोंग, आदिल रशीद

भारतीय संघ (प्लेइंग11) : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत