Headlines

आसाम-अरुणाचल सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती


गोळीबारात आसाममधील 8 जण गंभीर

वृत्तसंस्था

गुवाहाटी

आसामच्या धेमाजी जिह्यातील गोगमुखजवळ आसाम-अरुणाचल सीमेवर सोमवारी समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात किमान आठ जण गंभीर जखमी झाले. सीमेवरील मिंगमांग वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशातील समाजकंटकांनी आसामच्या बाजूची जमीन बळकावल्यानंतर त्यांना विरोध झाला. संतप्त झालेल्या जमावाने आसामच्या रहिवाशांना लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली असून तणाव कमी झाला असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत