Headlines

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


सावंतवाडी प्रतिनिधी : श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी आषाढी महाएकादशी निमित्त होणारे कार्यक्रम 25 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ६ वाजता : काकड आरती व महापूजा (पूजेचे मानकरी, श्री. शेखर गुरुनाथ धारगळकर व सौ. शर्वरी शेखर धारगळकर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे)

सकाळी ११.३० ते २.०० : श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम.

दुपारी २ ते ३ : श्री कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम.

दुपारी ३ ते ४ : महिला मंडळ सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम.

सायंकाळी ४ ते ६ : पंडित योगेश बोरचाटे माणगाव यांचा सुश्राव्य संगीत गायनाचा कार्यक्रम.

सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन. रात्रौ ९ नंतरः श्रींची पालखी सेवा.

रविवार दिनांक : २६/०७/२०२६

सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन.

रात्रौ ९ नंतरः  श्रींची पालखी सेवा.

सोमवार दिनांक : २७/०७/२०२६

सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन.

रात्रौ ९ नंतर : श्रींची पालखी सेवा.

मंगळवार दिनांक : २८/०७/२०२६

सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. सौ. सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांचे कीर्तन.

रात्री ९ नंतर : श्रींची पालखी सेवा.

बुधवार दिनांक : २९/०७/२०२६

सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन.

भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत