Headlines

आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक:म्हणाले- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास मूळ ओबीसी शिल्लकच राहणार नाही




राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली आहे. तसेच, “येत्या १ सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत धडकणार असून, सरकारला ओबीसींची ताकद आणि वज्रमूठ दाखवून देऊ,” अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. “मराठा समाज ओबीसीत आल्यास मूळ ओबीसी संपेल” मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मराठा समाजाची लढाई संपलेली असली तरी, ओबीसींची खरी लढाई आता संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल. जर मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात झाला, तर मूळ ओबीसी हा वर्गच शिल्लक राहणार नाही. ओबीसी संपेल आणि या प्रवर्गाच्या रकाण्यात फक्त मराठा किंवा कुणबी समाजाचेच नाव दिसेल.” यातून त्यांनी ओबीसी आरक्षणाला असलेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. “जरांगेंच्या शिव्या आणि आंदोलनाशी आम्हाला देणंघेणं नाही” मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करताना हाके म्हणाले, “मनोज जरांगे यांनी आंदोलन केले काय किंवा नाही केले काय, ते गेले काय किंवा राहिले काय, त्यांनी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या काय किंवा आम्हाला कितीही ट्रोल केले काय, आम्हाला त्याचे काहीही देणेघेणे नाही.” आमचे लक्ष केवळ आमच्या हक्कांवर असून कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. १ सप्टेंबरला मुंबईत ओबीसींचे मोठे शक्तिप्रदर्शन ओबीसींच्या हक्कासाठी १ सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे हाके यांनी सांगितले. “आमचे १ सप्टेंबरचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच. आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईला जाणार आहोत. ‘ही ओबीसींची एकजुट आणि वज्रमूठ आहे, नवे पर्व ओबीसी सर्व’, हा आमचा नारा सरकारला दाखवून देणार आहोत,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका:शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDAची ‘कारणे दाखवा’ नोटीस आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची ‘सरोगेट’ (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने (FDA) ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत