Shreyas Iyer News : भारतीय टी-२० संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर याने टीकाकारांना उत्तर दिले आहे. आयर्लंड मालिका भारतासाठी खराब ठरली होती. मात्र इंग्लंडमध्ये भारतीय संघ ताकदीने उतरल्याचं दिसलं. श्रेयस अय्यरने एक खास विक्रम नावावर केलाय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना पहिल्या विजयासाठी ४ जुलैची वाट पाहावी लागणार आहे. या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० ओव्हरमध्ये १८९-७ धावा केल्या होत्या. भारताकडून अभिषेक शर्मा (५९ धावा) आणि श्रेयस अय्यर (६८ धावा) यांनी अर्धशतके केली होतीत. आयर्लंडविरूद्ध भारताला दोन्ही सामने गमवावे लागल्याने श्रेयसच्या नेतृत्त्वावर टीका होऊ लागली. आयपीएलची कॅप्टन्सी आणि फॉर्म आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चालत नाही अशी टीका होऊ लागली होती. मात्र इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक करत सर्वांची तोंड बंद केलीत. श्रेयश असा विक्रम करणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.
श्रेयस अय्यर याने ४७ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार मारत त्याने ६८ धावा त्याने केल्या आणि कर्णधार म्हणून आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्या होत्या, त्यावेळी अभिषेकने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता. तेव्हा दुसरी बाजू कर्णधार म्हणून त्याने लावून धरली होती. अभिषेक गेल्यावर मिडल ऑर्डरमध्ये श्रेयसने दमदार खेळी केली. Abhishek Sharma : काय करतोय यार ईशान! अभिषेक शर्मा किशनवर चांगलाच भडकला, सामना रद्द पण Video तुफान व्हायरल श्रेयसने आपल्या अर्धशतकासाठी ३८ चेंडू घेतले, मॉर्डन क्रिकेटमध्ये स्लो अर्धशतक ठरेल. पण त्यावेळी त्याने विकेट धरून ठेवत पडझड थांबवली. पंरतु हे अर्धशतक विक्रमी ठरलेय, भारताच्या कर्णधाराने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच अर्धशतक ठोकले आहे. याआधी विराट कोहलीने २०१८ मध्ये कार्डिफ येथे ४७ धावा केल्या होत्या, त्यानंतर आता श्रेयसने ६८ धावा केल्या आहेत. FIFA World Cup 2026 : मेक्सिकोने 40 वर्षांनी गाठली बाद फेरी, रात्रभर जल्लोष पण विजयाला लागलं गालबोट, चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू श्रेयसने डाव सांभाळण्याआधी अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. संजू सॅमनस १ आणि ईशान किशन शून्य धावांवर परतल्याने भारत दबावात आला होता. पण अभिषेकने एकट्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत श्रेयसच्या साथीने ६-२ वरून पॉवर प्ले पर्यंत ६१-२ धावा पूर्ण केल्या. आपल्या ५९ धावांच्या खेळीमध्ये त्याने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. अभिषेक हा सर्वात कमी चेंडूत १०० षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. शेवटला शिवम दुबे याने २१ चेंडूत ४२ धावा केल्याने भारत १९० च्या जवळपास पोहोचला होता. पावसाने हा सामना झाला नाही, इंग्लंड संघ फलंदाजीला आलाच नाही आणि कारण पाऊस वाढल्याने सामन रद्द करण्यात आला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा