Headlines

आयर्लंडविरूद्ध भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दिसणार एकमेव बदल? वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही?


IND vs IRE Playing 11 News : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना आज होणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघ एक बदल करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण वैभव सूर्यवंशीला आज तरी खेळवावं अशी सर्वांची इच्छा आहे.

Vaibhav Sooryavanshi Gautam Gambhir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पहिल्या सामन्यातील पराभवाच्या धक्क्यानंतर आता भारतीय संघासमोर आयर्लंडविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिका बरोबरीत सोडवण्याचे दडपण असणार आहे. आज, रविवारी मालिकेतील अखेरचा आणि दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी प्लेइंग ११ मध्ये असणार की नाही याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पहिल्या सामन्यात त्याला संधी दिली जाईल असं बोललं जात होतं. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला बसवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पहिल्या सामन्यात पराभवाच्या धक्क्यानंतर संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बा बदल करत वैभवला संधी देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघ सहज बाजी मारणार असे वाटत होते. मात्र, जगज्जेत्या भारतीय संघाला शुक्रवारी आयर्लंडने धक्का दिला. हा आयर्लंडचा भारताविरुद्धचा पहिला विजय ठरला. आयर्लंडने १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर देताना भारताचा डाव १४८ धावांत आटोपला होता. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर दुसऱ्या सामन्यात दडपण असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नावावर कर्णधार म्हणून पहिला सामन्यात पराभव झाल्याने नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. कारण आतापर्यंत आयर्लंडच्या संघाने भारताला कोणत्याच फॉरमॅटमध्ये पराभूत केले नव्हते. मात्र शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये आयर्लंड विजय मिळवत इतिहास रचला.
Maharashtra TimesWomen’s T-20 World Cup 2026 : फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?
आजच्या सामन्यात संघात फक्त एकमेव बदल होण्याची शक्यता मानली जात आहे. ती म्हणजे प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी प्रिन्स यादव याला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या सामन्यात प्रसिद्धची आयर्लंडच्या गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. एका ओव्हरमध्ये तर त्याने २७ धावा दिल्या होत्या. त्यामुळे टीम मॅनेजमेंट प्रिन्सला संधी द्यायचा विचार करण्याची शक्यता आहे.
Maharashtra TimesIND vs IRE: आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया ढेपाळली, पण सूर्या दादाकडून एकाचं जाम भारी कौतुक; काय म्हणाला माजी कर्णधार?
दरम्यान, येत्या बुधवारपासून भारताची इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका सुरू होत आहे. त्याआधी, आयर्लंड दौऱ्याची सांगता विजयाने करण्यास श्रेयस उत्सुक असणार आहे. त्यामुळे आजच्या मालिकेचा शेवट कसा होतो हे पाहावं लागणार आहे. आयर्लंड इतिहास रचणार की भारत पहिल्या पराभवाचा वचपा काढत मालिका बरोबरीत सोडवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

टीम इंडिया संभाव्य 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा/प्रिन्स यादव

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा