अमित ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया देखील दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आम्हाला आमच्याच लोकांनी फसवले, असे स्पष्ट करत, आम्ही थांबलो नसून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. विकासासाठी काम करणार आहोच; शिवाय निवडणुकांकडेही गांभीर्याने पाहणार आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे यांनी गुरुवारी विविध महाविद्यालयांना भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने मते मांडली.
अमित ठाकरे काय म्हणाले?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होते. भाषणांना मोठी दाद मिळते आणि उपस्थित केल्या जाणाऱ्या विषयांना सर्वस्तरीय प्रतिसादही मिळतो; पण त्याचे परिवर्तन मतांमध्ये होत नाही, या विषयी अमित ठाकरे यांना छेडले असता ते म्हणाले, ‘हो, नाशिकसारख्या ठिकाणी जिथे काम केले तिथे यश मिळाले नाही म्हणून नक्कीच वाईट वाटते.’
‘आमच्याच लोकांनी फसवले’
“मुकणे धरणातून पाणी आणून ४० वर्षांपासूनचा प्रश्न मिटवला. जिथे-तिथे रस्ते केले. आता काम केलेल्या रस्त्यांच्याच निविदा काढल्या जात आहेत. पण आपण थांबलेलो नाही, काम सुरूच आहे आणि विकासावर भर दिला जात आहे. आम्ही इथेही स्थानिकांवर विश्वास ठेवला होता, पण आमच्याच लोकांनी फसवले”, असे अमित ठाकरे म्हणाले.
सत्ताधाऱ्यंनी राजकारण बिघडवल्याचा अमित ठाकरेंचा आरोप
“आता पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत आणि विकासावर कायम भर असणार आहेत. लोकांनीही हिंदू-मुस्लीम किती दिवस करायचे, याचा विचार केला पाहिजे. खरे म्हणजे भाजप एका तपापासून सत्तेवर असतानाही ‘हिंदू खतरे में है..’ असे भासवले जात असेल तर काय उपयोग? खरे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण राज्यातील राजकारण बिघडवून टाकले आहे”, असेही अमित ठाकरे म्हणाले.
‘विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार’
राज्यभरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणे-मुंबईमध्येही स्वच्छतागृहापासून ते स्वच्छतेपर्यंतचे कितीतरी प्रश्न समोर येत आहेत. भरमसाठ शुल्कांचाही विषय आहेच. छत्रपती संभाजीनगर शहरातील समस्याही जाणून घेणार आहे व त्यासाठीच शहरात दाखल झालो आहे. त्याशिवाय मराठवाड्यातही दौरा करणार असून, प्रश्न जाणून घेणार असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, अमित ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जावून विद्यार्थ्यांची भेटीगाठी घेत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा