Aamchur Production : नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरातील आमचूर उत्तर भारतातील विविध बाजारपोठांमध्ये पाठवण्यात येत आहे.आदिवासी लोकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याला योग्य प्रशिक्षण देऊन पुण्यातील सुयश ट्रस्टने आमचूरला या कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत केलं

‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ चा मोठा वाटा
या गावांमध्ये तयार होणारे आमचूर गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तर भारतातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येत आहे. या यशामध्ये पुण्यातील ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’चा मोठा वाटा आहे. या संस्थेने १९९० च्या सुमारास मोलगी गावातील कुटुंबांना देशी आंब्यापासून आमचूर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला हा केवळ कौशल्यविकासाचा उपक्रम होता; पण त्याने अल्पावधीतच बाजारपेठेत लोकप्रियता मिळविली, अशी माहिती ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक यशवंत घैसास यांनी दिली.
कुटुंबांना २० ते २५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न
सध्या सुमारे ४० ग्रामपंचायतींतील ३५० हून अधिक पाड्यांमध्ये हा उपक्रम विस्तारला आहे. उन्हाळ्यातील अवघ्या एक ते दोन महिन्यांत प्रत्येक वनवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरासरी २० ते २५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. पावसाळ्यापूर्वी घरखर्च, शेतीची तयारी, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी ही रक्कम कुटुंबांना मोठा आधार ठरते. या उपक्रमामुळे स्थलांतराचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे, असे ट्रस्टच्या अध्यक्षा स्मिता घैसास आणि कार्याध्यक्ष शलाका घैसास यांनी सांगितले.
आमचूर बाजारपेठ निर्माण केली
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगामधील विशेष म्हणजे नंदूरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरात गावठी आंब्यापासून तयार होणाऱ्या आमचूरने देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आमचूर बाजारपेठ निर्माण केली.मोलगी या परिसरातील आदिवासी कुटूंबाना आमचूर हा एक उत्पन्नाचा स्त्रोत आहे.या सगळ्यामध्ये सुयश चॅरिटेबल ट्रस्ट चे खुप मोठे योगदान आहे.
आमचूर बनवण्याचे कौशल्य पिढ्यानंपिढ्या आहे .
विशेष म्हणजे या मोलगी परिसरातील आदिवासी कुटुंबाना निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे विशेष ज्ञान असते.त्याच प्रमाणे जंगलातील आंब्याची झाडे शोधणे कैऱ्या गोळा करणे आणि त्यांचे आमचूर बनवणे याचे कौशल्य हे पिढ्यानपिढ्या आहे. आणि यालाच साथ मिळाली ती सुयश चॅरिटेबल ट्रस्टची या ट्रस्टने आदिवासी लोकांचे हे कौशल्य ओळखून त्यांना १९९० च्या दशकापासून आदिवासी कुटुंबाना आमचूर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.
आणि याच आमचूरने बाजारपेठ उपलब्ध करून दिलीच.त्याशिवाय या कुटुंबांना रोजगार मिळाला. आणि हे आमचूर अनेक कुटुंबांसाठी उत्पन्नाच महत्त्वाच साधन ठरलं

