Headlines

‘आमची इंग्लंड संघाकडे जास्त माहिती आहे’; ईशान किशनने भारताच्या पराभवाची सांगितली 2 कारणे


Ishan Kishan News : भारताचा इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात परभव केला. सामना संपल्यावर पत्रकार परिषदेत स्टार खेळाड ईशान किशन याने बोलताना भारताने सामना नेमका कुठे हरला सांगितलं आहे.

Ishan Kishan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रवी बिश्नोई टाकत असलेल्या डावातील १७व्या षटकाने शनिवारी भारताच्या हातून विजयाचा घास इंग्लंडने हिरावून घेतला. जेकब बेथल याने या षटकांत २९ धावांचा चोप दिल्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ४ विकेटने पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामना संपल्यावर बोलताना पत्रकार परिषदेत बोलताना ईशान किशन काय म्हणाला जाणून घ्या.

सुरुवातीपासूनच सामना आपल्या ताब्यात होता, पण दोन फ्री हिटमुळे इंग्लंडच्या फलंदाजांवरील दबाव कमी झाला आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला. आम्ही बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली आणि एक रणनीतीही होती, पण त्याचबरोबर बेथेलने बराच वेळ टिकून राहून संधीचा पुरेपूर फायदा घेतल्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. हरल्याने विचारांवर परिणाम होतो, पण आम्ही सगळे पुरेसे परिपक्व आहोत आणि काय चुकले आणि टीम म्हणून आपण कुठे सुधारणा करू शकतो हे आम्हाला समजतं, असं ईशान किशन म्हणाला.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : ‘मी आज खेळतोय’; वैभवने डेब्यूबद्दल सर्वात पहिलं कोणाला सांगितलं, ना आई ना कोच रोमी, मग कोण?
आम्ही सगळे हेच समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांचे खेळाडू आमच्याविरुद्ध काय करत आहेत. कारण त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. आम्ही एक टीम म्हणून 20 अतिरिक्त धावा कुठे काढू शकतो हे शोधावं लागेल. याबाबत आम्ही चर्चा करू आणि पुढच्या वेळी अजून चांगलं प्रदर्शन करू, असंही किशनने म्हटलं आहे.
Maharashtra TimesINDvsENG : विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?
या षटकाआधी सामना भारताच्या हातात होता. इंग्लंडला विजयासाठी २४ चेंडूंत ४९ धावांची आवश्यकता होती; मात्र विश्णोईच्या षटकांत सामन्याचे चित्रच पालटले. आकडेवारीनुसार या षटकाआधी इंग्लंडच्या विजयाची शक्यता ३२.५ टक्के होती. हा आकडा बिश्नोईच्या षटकानंतर ८६.४९ टक्क्यांवर पोहोचला. ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने १९व्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. यात जेकब बेथेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने ब्रूकसोबत २४ चेंडूत ५० धावांची, बँटनसोबत ५० चेंडूंत ६७धावांची भागीदारी रचली. तसेच, सॅम करनसोबत त्याने १६ चेंडूत ४६ धावांची भागीदारी रचली.
Maharashtra TimesIND vs ENG 2nd T20 : इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट
दरम्यान, वैभव सूर्यवंशीने पदार्पण करताना जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांना षटकार लगावले. मात्र, पाचव्या षटकात विल जॅक्सच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचीत झाला. संथ सुरुवातीनंतर त्याने आणि अभिषेक शर्माने २९ चेंडूंत ५० धावांची सलामी दिली. मधल्या टप्प्यात ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी भारताला सव्वाशे धावांचा टप्पा पार करून दिला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी रचली होती.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा