Headlines

आदिनाथ कोठारेच्या बॉलिवूड प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा!:दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'नई नवेली' प्रेक्षकांच्या भेटीला येणार




विविधांगी भूमिका असोत किंवा वर्षभर सुरू असलेले काम असो आदिनाथ नेहमीच प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसतो. सध्या रामायणसारख्या भव्य चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच भरताची भूमिका साकारणारा आदिनाथ मराठी टेलिव्हिजन विश्वात निर्मिती करतानाही दिसणार असल्याचे समोर आले आहे. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन आणि निर्मितीचा प्रवासही तितक्याच सातत्याने सुरू ठेवला आहे. रामायणमधील त्याच्या लूकची चर्चा सुरू असतानाच अभिनेता आदिनाथ कोठारे आणखी एका बॉलिवूड चित्रपटात खास भूमिका साकारणार असल्याच कळतंय. बॉलिवूड दिग्दर्शक आनंद एल राय यांचा नवा चित्रपट ‘नई नवेली’मध्ये तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘नई नवेली’ या चित्रपटाच्या रिलीज पोस्टरवर यामी गौतम दिसत असून यात आदिनाथ कोणती भूमिका साकारत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. आपल्या बॉलिवूडमधील कामाची सातत्यपूर्ण वाटचाल कायम ठेवत आदिनाथ आगामी काळात झी मराठीसाठी एका नव्या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. नई नवेली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर रामायण हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे असून एकूणच आगामी काळात आदिनाथ प्रेक्षकांना आणखी नव्या कथा आणि भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत