Headlines

आता मुंबई टी-२० लीगमध्ये ९ संघ! MCAनं नव्या टीमसाठी निविदा मागवल्या, कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?


Mumbai T20 League News : मुंबई टी-२० लीगमध्ये आता नवी मुंबईचा नवा संघ दाखल होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासाठी निविदा मागवल्या असून लीगमधील संघांची संख्या नऊ होणार आहे.

Mumbai T20 League
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशनतर्फे दरवर्षी टी-२० लीग आयोजित केली जाते. मुंबईतल्या होतकरु-स्थानिक क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. याठिकाणी खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते. त्यामुळे एमसीएच्या या स्पर्धेचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. आता याच स्पर्धेसंदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता टी-२० मुंबई लीगमध्ये एका नवीन संघाच्या एन्ट्रीची तयारी केली आहे. त्यासाठी आवश्यक निविदाही मागवल्या आहेत. त्यामुळे एमसीएच्या या पुरुषांच्या स्पर्धत आता ९ संघ दिसणार आहेत. आतापर्यंत ही लीग ८ संघांची होती.

दरम्यान, हा नवा संघ कोणता असणार आहे, याचीही माहिती समोर आली आहे. निविदा मागवण्यात आलेला नवा संघ नवी मुंबई क्षेत्रातील खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे मुंबई टी-२० लीगचाही विस्तार होणार आहे आणि मुंबईतल्या आणि आसपासच्या परिसरातील गुणवंत क्रिकेटपटूंना त्यांना सिद्ध करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.

Maharashtra TimesYuzvendra Chahal : बाबो! एकाच मालिकेत आतापर्यंत 15 विकेट्सचा धडाका; टीम इंडियातून बाहेर असलेल्या युझी चहलचा पुन्हा कमबॅकचा दावा?

चौथ्या हंगामाला मोठा प्रतिसाद

जून २०२६ मध्ये लीगचा चौथा हंगाम पार पडला. त्यानंतर लगेच काही दिवसांत ही नवी घडामोड समोर आली आहे. पार पडलेल्या हंगामामध्ये क्रिकेटच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्याचबरोबर स्पर्धेतही चुरशीचा खेळ झाला. त्यामुळे मुंबई टी-२० लीगही फ्रँचायझी आधारित देशांतर्गत स्पर्धांमध्ये मजबूत स्थितीत पोहचल्याच चित्र आहे.

दरम्यान, या लीगसाठी इच्छुक पक्ष १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘क्रिकेट सेंटर, वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मुंबई येथील MCA कार्यालयातून निविदा कागदपत्रे प्राप्त करु शकणार आहेत.

यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नावे २.५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) भरून ही निविदा कागदपत्रे मिळवता येतील. तर, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या निविदा सूचनेत नमूद केलेल्या बँक खात्यात दिलेली रक्कम हस्तांतरित करूनही (बँक ट्रान्सफरद्वारे) शुल्क भरता येईल.

Maharashtra TimesVVS Laxman COE : दुखापतींमुळे 13 खेळाडू COEमध्ये! टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये नेमकं काय चालतं? लक्ष्मण यांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिली

टी-२० मुंबई लीगमधील आठ संघ

  1. आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस
  2. एआरसीएस अंधेरी
  3. वांद्रे ब्लास्टर्स
  4. ईगल ठाणे स्ट्रायकर्स
  5. एमएससी मराठा रॉयल्स
  6. नॉर्थ मुंबई पँथर्स
  7. सोबो मुंबई फाल्कन्स
  8. ट्रायम्फ नाइट्स एमएनई
सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा