Headlines

आता कसं वाटतंय! भारताने इंग्लंडला पहिल्याच वनडेत लोळवलं, 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी, विजयाचे शिल्पकार कोण?


IND vs ENG 1st ODI News : भारताला टी-२० मालिकेत एकही सामना जिंकू न देणाऱ्या इंग्लंड संघाला पहिल्या वनडे सामन्यामध्ये धूळ चारली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही लवकर आऊट झाले होते, सामना फसला असे वाटत होते मग कोणी मॅच फिरवली जाणून घ्या.

IND vs ENG 1st ODI Match Result
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पहिल्या वनडे सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा ६ विकेटने पराभव केला. भारताने या मालिकेची सुरूवात विजयाने करत १-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या टी-२० मालिकेत एकही विजय मिळवता आला नव्हता. वनडेमध्ये भारतीय संघाने हा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यामध्ये इग्लंडने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी ४७.५ ओव्हरमध्ये २५८ धावांवर इंग्लंड संघाला ऑल आऊट केले होते. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक नाबाद ७६ आणि लियान डॉसनने ६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ८० धावा केल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. अक्षर पटेलने नाबाद ५७ धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदरनेही नाबाद ५२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नव्हती. कारण भारताने इंग्लंडचा अर्धा संघ ८० धावांवर माघारी पाठवला होता. गुरनूर ब्रारने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. त्यानंत बुमराहने हॅरी ब्रुकला आऊट करत तिसरा धक्का दिला होता. त्यापाठोपाठ प्रसिद्ध कृष्णानेही दोन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटला ढकलले. परंतु जो रूट ७६ चेंडूत ७६ धावा आणि लियान डॉसनची ६८ धावांची अर्धशतकी खेळी करत दोघांनी सातव्या विकेटसाठी १२१ धावांची केलेली भागीदारी इंग्लंडसाठी महत्त्वाची ठरली. भारताकडून अक्षर पटेलने ४, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी २-२ विकेट घेतल्या.
Maharashtra TimesJasprit Bumrah : वाघ आहे वाघ! बुमराहची घातक बॉलिंग, ‘शाना’चा कडक कॅच; खतरनाक ब्रूकचा टप्प्यात कार्यक्रम करत 150 विकेट पूर्ण
भारतीय संघ या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा लवकर आऊट झाले होते. भारताची अवस्था ४८-२ अशी झाली होती त्यामुळे भारतावर दडपण आले होते. मात्र श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी १०१ धावांची भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. दुखापतीमुळे गिल ८० धावांवर रिटायर हर्ट झाला होता. त्यानंतर अय्यर ३५ धावांवर रन आऊट झाला, त्यापाठोपाठ राहुलही १ धाव काढून माघारी परतला मात्र अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १०५ चेंडूत नाबाद १०५ धावांची भागीदारी करत सामना खिशात घातला.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : एक द्विशतक, शेवटच्या वनडेमध्ये वादळी शतक तरीही प्लेइंग 11 मध्ये जागा नाहीच, मॅचविनर खेळाडू बाहेर; नेमका कोण?
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये अक्षर पटेल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अक्षरने आज ९.५ ओव्हरमध्ये ६२ धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या.भारत अडचणीत असताना ५२ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. भारताने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली असून दुसरा वनडे सामना १६ जुलैला होणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा