Headlines

अमेरिकेत भारतीय मुस्लिमावर चाकू हल्ला:आरोपी म्हणाला- 'मला मुस्लिमांना मारायचे आहे'; धर्म विचारल्यानंतर केला वार




अमेरिकेतील यूटा राज्यातील वेस्ट व्हॅली सिटी येथील व्हॅली फेअर मॉलमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिक सोहेलवर धर्म विचारल्यानंतर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने मुस्लिम असल्यामुळे सोहेलला लक्ष्य केले आणि त्याचा उद्देश ‘मुस्लिमांना मारण्याचा’ होता. ही घटना सोमवारी घडली. पोलिसांनी 48 वर्षीय पीटर मायकल लार्सनला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि धोकादायक शस्त्र बाळगणे व वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो सॉल्ट लेक काउंटी तुरुंगात आहे. मॉलमधील ज्वेलरी दुकानात काम करणाऱ्या लूना नुनेज यांनी सांगितले की, आरोपी आधी सोहेलकडे गेला आणि त्याने बोलणे सुरू केले. त्याने विचारले, “तू कुठून आहेस?” सोहेलने उत्तर दिले, “मी भारतातून आहे, माझे नाव सोहेल आहे.” यानंतर आरोपीने विचारले, “तू मुस्लिम आहेस का?” सोहेलने ‘हो’ म्हणताच, आरोपीने चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले. युटा इस्लामिक सेंटरचे इमाम शुऐब दीन यांनी सांगितले की, आरोपीने आधी सोहेलकडे पाण्याची बाटली मागितली होती. सोहेल पाणी देण्यासाठी वळताच, त्याने मागून चाकूने हल्ला केला. पॅरिसजवळच्या जंगलात भीषण आग; सीन नदीतून पाणी घेऊन विमाने आग विझवत आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या दक्षिणेकडील फॉन्टेनब्लो जंगलात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल सातत्याने मोहीम राबवत आहे. आग विझवणारी विमाने सीन नदीतून पाणी भरून प्रभावित भागात फवारणी करत आहेत. आतापर्यंत सात चौरस मैल (सुमारे 18 चौरस किलोमीटर) पेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले आहे. फॉन्टेनब्लो अभियोजन कार्यालयाच्या मते, आग लागल्याच्या चौकशीच्या संदर्भात सहा जणांना पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. यामध्ये 19 वर्षीय एका स्वयंसेवक अग्निशमन कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. फ्रान्समध्ये जंगलात जाणूनबुजून आग लावल्यास 1.5 लाख युरोपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. जर आगीमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा पर्यावरणाला गंभीर नुकसान होण्याची शक्यता असेल, तर शिक्षा 15 वर्षांपर्यंत वाढू शकते. अलीकडील उष्णतेच्या लाटेचा परिणाम संपूर्ण युरोपमध्ये दिसून येत आहे. जूनच्या अखेरीस पश्चिम युरोपमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान 10 हजारांहून अधिक अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली, ज्यात बहुतेक वृद्ध होते. स्पेनमध्ये अलीकडे लागलेल्या जंगलातील आगीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 10 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर इंग्लंड आणि वेल्समध्येही मे आणि जूनमधील उष्णतेच्या लाटेदरम्यान 2,700 हून अधिक लोकांच्या मृत्यूचा अंदाज आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत