Zee Marathi Tarini Serial New Entry Mansi Kulkarni ; Tarini New Entry : तारिणीच्या टीममध्ये होणार नव्या बॉसची एण्ट्री, स्टार प्रवाहची खलनायिका साकारणार दबंग रोल
Zee Marathi Tarini Serial New Entry Mansi Kulkarni ; Tarini New Entry : तारिणीच्या टीममध्ये होणार नव्या बॉसची एण्ट्री, स्टार प्रवाहची खलनायिका साकारणार दबंग रोल
Tarini Serial Update : तारिणी या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून लवकरच नव्या बॉसची एण्ट्री होताना पाहायला मिळेल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तारिणी या झी मराठीवरील मालिकेमध्ये नेहमीच वेगवेगळी रंजक वळणे येत असतात. शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी तारिणीची टीम प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच आता या टीम मध्ये एका नव्या ऑफिसरची एन्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपासून या मालिके संदर्भात एका पाठमोऱ्या महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत होता. त्यामुळे या मालिकेत आता कोणती नवी अभिनेत्री पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला असून ती व्यक्ती कोण आहे हे देखील कळले आहे.
तारिणी या मालिकेत सध्या पोलिसांची टीम गुलाब मर्डर मागचा हात कोणाचा आहे याचा छडा लावत आहे. तारिणी गुलाब पर्यंत पोहोचणार होतीच तोच त्याची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे तारिणीच्या आईचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सुद्धा तिच्यासमोर उभा राहिला. पण जाता जाता गुलाबने तारिणीला एक हिंट दिली आहे की तुझ्या आईला मारणारी व्यक्ती ही तुझ्याच जवळची आहे. त्यामुळे संशयाची सुई ही प्रत्येकावर घोंगावत आहे.
Tharala Tar Mag : एका चुकीमुळे अस्मिताला राकेशवर संशय, मधुभाऊंची घालमेल समजून सायलीचा मोठा निर्णय, आश्रमाचा डोलारा स्वत: सांभाळणार तारिणी या मालिकेमध्ये आता जे जे हे पात्र स्टार प्रवाह वरील लोकप्रिय खलनायिका मानसी कुलकर्णी साकारणार आहे. ती थोडं थोडं माझं या मालिकेत खलभूमिका साकारताना शेवटची दिसली होती. त्यानंतर आता ती तारिणी मधून सीनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून समोर येते. तिचा डॅशिंग लुक प्रमोद प्रेक्षकांना मोहित करत आहे. एखाद्या गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करून घेण्याची व अन्याय झालेला न्याय मिळवून द्यायची जेजेची एक वेगळी पद्धत असते यासाठी संपूर्ण पोलीस फोर्स तिचे कौतुक करतं.
मुलाला वाढवताना केलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल निवेदिता सराफ यांना वाटते खंत?
तारिणी या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना येत्या एपिसोडसाठी आता भरपूर उत्सुक वाटू लागली आहे. तारिणी या मालिकेची क्रेझ इतकी आहे की काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या एका फॅनने त्यांच्या नवजात मुलीचे नाव तारिणी असे ठेवले. आपली मुलगी सुद्धा मालिकेतील तारिणीप्रमाणे शूर वीर व्हावी अशी त्यांची या मागे इच्छा होती. मालिकेची निर्माती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने ही अभिमानाची गोष्ट आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना कळवली होती.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा