Headlines

Zee Marathi Tarini Serial New Entry Mansi Kulkarni ; Tarini New Entry : तारिणीच्या टीममध्ये होणार नव्या बॉसची एण्ट्री, स्टार प्रवाहची खलनायिका साकारणार दबंग रोल


Tarini Serial Update : तारिणी या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून लवकरच नव्या बॉसची एण्ट्री होताना पाहायला मिळेल.

तारिणी
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तारिणी या झी मराठीवरील मालिकेमध्ये नेहमीच वेगवेगळी रंजक वळणे येत असतात. शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी तारिणीची टीम प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच आता या टीम मध्ये एका नव्या ऑफिसरची एन्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपासून या मालिके संदर्भात एका पाठमोऱ्या महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत होता. त्यामुळे या मालिकेत आता कोणती नवी अभिनेत्री पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला असून ती व्यक्ती कोण आहे हे देखील कळले आहे.

तारिणी या मालिकेत सध्या पोलिसांची टीम गुलाब मर्डर मागचा हात कोणाचा आहे याचा छडा लावत आहे. तारिणी गुलाब पर्यंत पोहोचणार होतीच तोच त्याची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे तारिणीच्या आईचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सुद्धा तिच्यासमोर उभा राहिला. पण जाता जाता गुलाबने तारिणीला एक हिंट दिली आहे की तुझ्या आईला मारणारी व्यक्ती ही तुझ्याच जवळची आहे. त्यामुळे संशयाची सुई ही प्रत्येकावर घोंगावत आहे.

Maharashtra TimesAkshay Waghmare : ‘मी स्वत: पास झालो तेव्हाही मला इतका आनंद झाला नव्हता’,लेकीनं पूर्ण केलं आई-वडिलांचं स्वप्न, अक्षय वाघमारेकडून बायकोचं भरभरुन कौतुक
मालिकेत काही दिवसांपूर्वी साधु सरांची बदली झाल्याचे दाखवले गेले त्यामुळे आता अधिकारी म्हणून जया जगदाळे हे नवे पात्र तारिणीच्या टीम मध्ये बॉस म्हणून इंट्री घेत आहे. जया जगदाळेला सगळेच जे जे म्हणून संबोधतात असे प्रोमो मध्ये पाहायला मिळते.

मानसी कुलकर्णी

Maharashtra TimesTharala Tar Mag : एका चुकीमुळे अस्मिताला राकेशवर संशय, मधुभाऊंची घालमेल समजून सायलीचा मोठा निर्णय, आश्रमाचा डोलारा स्वत: सांभाळणार
तारिणी या मालिकेमध्ये आता जे जे हे पात्र स्टार प्रवाह वरील लोकप्रिय खलनायिका मानसी कुलकर्णी साकारणार आहे. ती थोडं थोडं माझं या मालिकेत खलभूमिका साकारताना शेवटची दिसली होती. त्यानंतर आता ती तारिणी मधून सीनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून समोर येते. तिचा डॅशिंग लुक प्रमोद प्रेक्षकांना मोहित करत आहे. एखाद्या गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करून घेण्याची व अन्याय झालेला न्याय मिळवून द्यायची जेजेची एक वेगळी पद्धत असते यासाठी संपूर्ण पोलीस फोर्स तिचे कौतुक करतं.

मुलाला वाढवताना केलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल निवेदिता सराफ यांना वाटते खंत?

तारिणी या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना येत्या एपिसोडसाठी आता भरपूर उत्सुक वाटू लागली आहे. तारिणी या मालिकेची क्रेझ इतकी आहे की काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या एका फॅनने त्यांच्या नवजात मुलीचे नाव तारिणी असे ठेवले. आपली मुलगी सुद्धा मालिकेतील तारिणीप्रमाणे शूर वीर व्हावी अशी त्यांची या मागे इच्छा होती. मालिकेची निर्माती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने ही अभिमानाची गोष्ट आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना कळवली होती.