Headlines

Zee Marathi Serial : समरचं स्वानंदीला खास सरप्राइज, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री; प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेना


Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेमध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार असून प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

Swapnil Joshi In Veen Doghantali Hi Tutena Serial
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये नव-नवीन प्रयोग होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा संवाद विरहित स्पेशल एपिसोड प्रसारित करण्यात आला. या एपिसोडचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात आलं. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये गायक महेश काळे यांची एन्ट्रीही झालेली. अशातच आता स्वप्नील जोशीची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये एन्ट्री होणार असून झी मराठीनं मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा प्रोमो

‘झी मराठी’नं शेअर केलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या प्रोमोमध्ये समर स्वानंदीला रोमँटिक डेटवर घेऊन जातो. समर, स्वानंदीला नाटक बघायला घेऊन जातो. समर आणि स्वानंदी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात ‘लग्नपंचमी’ हे नाटक पाहण्यासाठी जाणार आहेत. नाटक पाहताना रोमँटिक सीनमध्ये समर मुख्य कलाकारांच्या जागी स्वतःला आणि स्वानंदीला इमॅजिन करतो. समर आपलं नाटक पाहायला आल्याचं समजताच स्वप्नील आनंदी होतो. स्वप्नील, समर आणि स्वानंदीला भेटायला बोलावतो. स्वप्नीलला पाहून स्वानंदी खूप आनंदी होते आणि तीसुद्धा नाटकातील सर्व कलाकारांना भेटते. या खास सरप्राईजमुळे समर आणि स्वानंदीचं नातं आणखी घट्ट होणार आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत मालिकेचं कौतुक केलं आहे. ‘असे काही तरी नवनवीन प्रयोग केले तर मालिका बघायला मजा येते..आणि आतुरतेने प्रेक्षक बघतात..कदाचित नाट्यगृहाकडे प्रेक्षकांची वाटचालही होऊ शकते.’, ‘लेखकांनी एक वेगळंच वळण घेतल्याबद्दल धन्यवाद!’, ‘मस्त’, ‘क्या बात है’ अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे.
Maharashtra TimesMeena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा
दरम्यान, ‘लग्नपंचमी’ या नाटकामध्ये स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी नाटकात अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती. मात्र, इतर कामांमुळे अभिनेत्रीनं नाटकातून एक्झिट घेतली. आता अमृताची भूमिका विदुला साकारत आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णीचं ‘लग्नपंचमी’ या नाटकाची लेखिका आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा