Headlines

Zee Marathi Actress Mahima Mhatre Removed Bandage From Face After 8 Months ; अखेर 8 महिन्यांनी झी मराठीच्या अभिनेत्रीने काढली चेहऱ्यावरची पट्टी, अपघात नेमका कसा घडला यामागचं खरं कारण समोर


Zee Marathi Actress Accident Reason : तुला जपणार आहे मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे 8 महिने चेहऱ्यावर पट्टी लावून शूट करत होती. अखेर तिने ते काढली असून तिच्यासोबत नेमकं काय घडलेलं यामागचं कारण सांगितलं आहे.

mahima mhatre
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तुला जपणार आहे ही झी मराठीवरील मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेमध्ये हॉरर कथानक दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचाही या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. या मालिकेतल्या प्रत्येक स्टार कास्टने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. मालिकेचे मुख्य अभिनेत्री असलेली मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे ही सुद्धा प्रेक्षकांची आवडती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत नाकावर आणि डोळ्याच्या वरच्या बाजूला पट्टी लावून सीन शूट करत होती. काही मुलाखतीमध्ये तिने अपघात झाल्याचे सांगितले होते. साधारण आठ महिने महिमाने तोंडावर पट्टी लावूनच शूट केले. पण आता तिने ती पट्टी काढली असून तिच्यासोबत नक्की काय घडलेले याबाबतचा खुलासा केला.

Maharashtra TimesSubhash Ghai On Balasaheb Thackeray : ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यामुळे लोकांचा संताप पण बाळासाहेब ठाकरेंची मदत, सुभाष घईंनी सांगितली आठवण
अभिनेत्री महिमा म्हात्रे तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की , गेले काही महिने मी नाकावर आणि कपाळावर पट्टी लावून मालिकेचे शूटिंग करत होते. सगळेच मला विचारत आहेत की नेमकं काय झालं होतं आणि इतके महिने तू पट्टी लावून का शूट करतेस? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. मध्यंतरी मी मालिकेतही दिसत नव्हते. तेव्हा सुद्धा प्रेक्षकांनी मला खूप मनापासून मिस केलं होतं. माझ्या सोशल मीडिया पोस्टवर किंवा कमेंट बॉक्समध्ये, डीएमस मध्ये मला तशा कमेंट यायच्या. आज माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज मी माझ्या नाकावरची पट्टी काढतेय. इतके दिवस तुम्ही सगळे प्रश्न विचारत होता आणि मला कोणालाही उत्तर देता येत नव्हतं पण आज इतक्या दिवसांनी मी ही पट्टी काढली आहे आणि आता लवकरच तुम्हाला एपिसोड मध्ये मी जशी आहे तशीच पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल.

Maharashtra TimesVandana Gupte On Raj Thackeray Wedding : रुममध्ये मुद्दाम पापड ठेवले, जागोजागी अलार्म लपवून त्रास दिलेला! वंदना गुप्तेंनी सांगितली शर्मिला-राज ठाकरेंच्या लग्नातली धमाल

महिमा म्हात्रेचा अपघात

महिमाने त्या व्हिडिओमध्ये सांगितले की तुला जपणार आहे या मालिकेत एक सीन होता ज्यामध्ये मीरा अथर्वचा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. या सीन साठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. एका मैदानात हे शूटिंग पार पडणार होतं. आम्ही दोन-तीन शॉट शूट सुद्धा केले होते. सगळं उत्तम सुरू होतं पण शेवटच्या सीनच्या वेळी घोडा खूप वेगाने धावत होता. तो अस्वस्थ झाल्याने अचानक उधाळला, मी लगाम खेचून त्या घोड्याला नियंत्रित करण्याचा, त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण तो काही केल्यास थांबेच ना! आणि शेवटी आम्ही दोघेही खाली पडलो. आधी सुरुवातीला आम्हाला वाटलेलं की इतकं काही झालं नाहीये पण अचानक नाकावर रक्ताची धार सुरू झाली तेव्हा मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्या क्षणी मला माझे संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर दिसत होते. व्हिडिओमध्ये अपघाताचा किस्सा सांगताना महिमा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

ती पुढे म्हणाली की अपघाता नंतर दोन-तीन दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला होता पण तरीही अवघ्या सात-आठ दिवसांमध्येच मी पुन्हा सेटवर परतली आणि डोक्यावर पट्टी लावूनच शूटिंग सुरू ठेवलं. घोड्यावरून पडल्याच्या अपघातामुळे माझ्या नाकावर आणि कपाळावर एक खोल जखम झाली होती ज्याचा व्रण तयार झाला होता. तोडग अधिक गडद होऊ नये आणि सूर्यप्रकाश त्यावर पडू नये यासाठी काळजी म्हणून डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच मी ती पट्टी नाकावर लावली होती.

तुला जपणार आहे मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास ही हॉरर मालिका दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा