स्वातंत्र्यदिनानिमित्त वक्फ बोर्डानं आयोजित केलेला एक कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही मुली काश्मिरी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे वक्फ बोर्डाला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागतंय. काही लोकांनी आरोप केला आहे की, इस्लामिक मूल्यांचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेली ही संस्था त्याच मूल्यांच्या विरोधात काम करत आहे. दरम्यान, झायरा वसीमनंही या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
झायरा वसीमची पोस्ट
झायरा म्हणाली की, ‘नुकताच काश्मीरमधील कुठल्यातरी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला. हा कार्यक्रम वक्फ बोर्ड ाच्या वतीनं किंवा त्याच्या नावाखाली आयोजित करण्यात आला होता, असं दिसतं. माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. वक्फ बोर्ड ही धार्मिक संस्था आहे ना? मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हितासाठी काम करण्याची, तसेच इस्लामी मूल्यांचं जतन करण्याची जबाबदारी ज्या संस्थेवर आहे, तिच्याकडून आपण चांगल्या आणि अर्थपूर्ण अपेक्षा ठेवू नयेत का?’
Shubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना
‘म्हणूनच या सगळ्यात एक विचित्रपणा जाणवतो. एका धार्मिक आणि सामुदायिक उद्देशाभोवती उभी असलेली संस्था अशा कार्यक्रमांना सहजपणे मान्यता देते, ज्यामध्ये फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मुलींना डान्स करायला लावते. मुलांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायचं एवढाच उद्देश आहे का? आणि विशेषतः मुलींना डान्स करायला लावणं, तेही अनेकदा त्या प्रसंगाशी फारसा संबंध नसलेल्या गाण्यांवर! हेच मनोरंजनाचं योग्य माध्यम का मानलं जातं?’
‘आपण त्यांना विचार करायला, काही निर्माण करायला, शिकायला, चर्चा करायला, प्रश्न विचारायल किंवा समाजासाठी प्रत्यक्ष योगदान द्यायला का प्रवृत्त करत नाही? विशेषतः काश्मीरसारख्या ठिकाणी ही गोष्ट अधिक खटकते. काश्मीरची एक समृद्ध बौद्धिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती किंवा कौशल्य मिळवणे नव्हे, तर ज्ञानाची आणि अध्यात्माची जाणीव निर्माण करणे, अशी व्यापक दृष्टी जोपासणारे अनेक महान विद्वान, विचारवंत आणि शिक्षक या भूमीत होऊन गेले.’
‘एखाद्या संस्थेचं अस्तित्वच जर धार्मिक उद्देशाशी जोडलेलं असेल, तर त्याची जबाबदारी केवळ कार्यक्रम आयोजित करण्यापुरती मर्यादित असू शकत नाही. समाजाच्या आध्यात्मिक, नैतिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी काहीतरी अधिक चांगलं काम करणं हीच या संस्थेची खरी भूमिका असायला हवी. आणि स्पष्ट सांगायचं तर, मुद्दा मुलांचा नाही. मुलं अनेकदा शाळा किंवा संस्था त्यांना जे सांगितलं जातं, तेच करतात. त्यांना नाचायला सांगितलं तर ते नाचतात; एखादं सादरीकरण करायला सांगितलं तर ते ते करतात. मुलांनी काय केलं हा प्रश्न नाही. एखादी संस्था आपल्या नावाखाली काय करते, कशाला प्रोत्साहन देते आणि कशाला मान्यता देते, हा प्रश्न आहे. विशेषतः ज्या संस्थेवर समाजाच्या आध्यात्मिक, नैतिक आणि बौद्धिक प्रगतीची जबाबदारी आहे, त्या संस्थेनं आपल्या मुलांसमोर केवळ कार्यक्रम नव्हे, तर विचारांची, ज्ञानाची, जबाबदार नागरिकत्वाची शिकवण द्यायला हवी.’ असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलं आहे.

