Headlines

Young man married two months ago dies and five year old boy tragic end on his birthday; दोन महिन्यांपूर्वी लग्न, पण भीषण अपघातात तरुणाच्या मृत्यूने संसार उद्ध्वस्त; वाढदिवशीच पाच वर्षीय नीरजचाही दुर्दैवी अंत


महेश पाटील, नंदुरबार: तळोदा शहराजवळील हातोडा पुलाजवळ नंदुरबार रस्त्यावरील वळणावर रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या हृदयद्रावक अपघातात दुचाकीस्वार जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षीय नीरजकुमार कल्याणसिंह गिरासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयपालसिंग यांची पत्नी निकिता गिरासे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील गिरासे कुटुंबीय तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी पल्सर दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एआर ६०४३) गेले होते. भेट आटोपून ते परत आपल्या गावी निघाले होते. त्याचवेळी नंदुरबारकडून येणारी एमएच ०४ जीजे ०९३० क्रमांकाची स्विफ्ट कार हातोडा पुलाजवळील वळणावर आली. वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली आणि काही क्षणांत आनंदी प्रवास दुःखाच्या खोल दरीत कोसळला.

अपघात इतका भीषण होता की, जयपालसिंग गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा आणि निकिता गिरासे यांचा विवाह झाला होता. संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नवजीवनाची सुरुवात करणाऱ्या या दाम्पत्यावर नियतीने निर्दयी आघात केला.

या अपघातात सर्वाधिक वेदनादायक ठरली ती पाच वर्षीय नीरजकुमार कल्याणसिंह गिरासे याची कहाणी. जयपालसिंग यांच्यासोबत त्यांच्या साडूचा मुलगा नीरजकुमारही दुचाकीवर होता. योगायोग म्हणजे रविवारीच त्याचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाच्या आनंदाची तयारी सुरू असताना नियतीने त्या चिमुकल्यालाच हिरावून नेले. केक कापण्याऐवजी घरात शोककळा पसरली. वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हातोडा पुलाजवळील वळणावर नागरिकांनी संताप व्यक्त करत सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली.

बलवंड गावात या घटनेनंतर शोककळा पसरली असून गिरासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

वाढदिवसाचा केक राहिला तसाच; घरात आक्रोश

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आनंदाने सुरू झालेला जयपाल आणि निकिता यांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. लग्नाच्या स्वप्नांनी सजलेले आयुष्य अजून फुलतही नव्हते, तोच काळाने घाला घातला. दुसरीकडे, घरात पाच वर्षीय नीरजकुमारच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. केक कापण्याची वेळ येण्याआधीच त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली आणि आनंददायी घर एका क्षणात शोकसागरात बुडाले. एका भीषण अपघाताने दोन कुटुंबांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत