Headlines

Yavatmal Post Office: बाबो! थोडेथोडके नव्हे, तर तीन पोती टपाल जप्त; पोस्टमन दादाने पत्रंच वाटप केले नाही, काय कारण? – three bags of mail seized from yavatmal pandharkawda postman satish dhurve house


Yavatmal Postal Scam: एका पोस्टमनच्या घरातून वाटप न करण्यात आलेल्या टपालांची तीन पोती जप्त करण्यात आली आहेत.

yavatmal post office
yavatmal post office(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: आजच्या इंटरनेटच्या जगातही पोस्टाचे महत्व कायम आहे. रोज येणाऱ्या पोस्टमनची वाट आपण पाहत असतो. कुरिअरच्या स्पर्धेतही पोस्टाच्या लाल पेटीत साधे पोस्टकार्ड टाकले तरी ते संबंधित व्यक्तीला मिळणारच हा विश्वास अजूनही कायम आहे. मात्र या विश्वासाला तडा देण्याचे काम पांढरकवडा येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मागील वर्षभरापासून काही महत्वाची कागदपत्रे असलेली रजिस्टर, पुस्तकांचे टपाल मिळत नसल्याचे लक्षात आले. याविषयी पांढरकवडा येथील ज्येष्ठ विधीज्ञ गाझी इबादुल्ला खान यांनी पोस्टमास्तरकडे २२ डिसेंबरला तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोस्टमास्तर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तक्रारकर्ते ॲड. खान यांच्याबरोबर पोस्टमन सतीश धुर्वे यांच्या घरी पाठविले. कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता वाटप न केलेल्या टपालांची तीन पोती दडवून ठेवल्याची आढळून आली.

Maharashtra TimesNashik Crime: दुकानदाराच्या तक्रारीमुळे हताश, नाशकात 29 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य; रात्रभर बेपत्ता अन्…
कर्मचाऱ्यांनी पोती उघडून पाहिली असता त्यांना अनेकांचे आधारकार्ड, एटीएम कार्ड, वाहनपरवाना, नोकरीचे कॉल, जीवन विमा पॉलिसीसह महत्वाच्या नोटीस आढळून आल्या. हे सर्व घेऊन कर्मचारी टपाल कार्यालयात आले. या प्रकरणाची मुख्य डाकघर अधीक्षक मोहन निकम (यवतमाळ) यांनी वणी येथील उपविभागीय पोस्टमास्तर अशोक मुंडे यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. चौकशीचा अहवालही अधीक्षकांना देण्यात आला आहे.

Maharashtra TimesNashik Crime: क्रूरतेची हद्द! त्र्यंबकमध्ये सापडली अनोळखी महिलेची बॉडी, अंगावर अक्षरश:.., घटनेनं खळबळ
नव्या तक्रारीने खळबळ
हे सारे घडत असतानाच पांढरकवडा येथे एचडीएफसी बँकेतील मनीष प्रधान यांनी तक्रार दाखल केली. ७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील एचडीएफसी बँकेतील अभिजित मालोकार यांच्याकडे मौल्यवान वस्तू असलेले पार्सल स्पीड पोस्टने पाठवले. त्याची पावती त्यांनी घेतली. नियमाप्रमाणे ८ ऑक्टोबर रोजी पार्सल मिळणे अपेक्षित होते. पण, ते मिळालेच नाही. शेवटी त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी पांढरकवडाच्या पोस्टमास्तरकडे तक्रार दाखल केली. अडीच महिने होऊनही पार्सल नागपूरला पोहचले नाही. त्यांच्या तक्रारीचे काय झाले हेदेखील पोस्टमास्तरने कळविले नसल्याचे प्रधान यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा