Yatin Karyekar : मराठी अभिनेते यतीन कार्येकर यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. यतीन यांचा घटस्फोट झाला तेव्हा ते डिप्रेशनमध्ये गेले होते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ फेम आनंद भाई, म्हणजेच अभिनेते यतीन कार्येकर , वयाच्या ६० व्या वर्षी सिंगल आहेत. तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर त्यांनी १९९६ मध्ये अभिनेत्री इरावती हर्षेशी लग्न केलं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि २००१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यतीन यांना दारूचं व्यसन लागलेलं. या कठीण काळाबद्दल यतीन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये यतीन यांनी सांगितलं की, घटस्फोटानंतर त्यांना स्ट्रॉन्ग राहण्याची गरज होती. नाहीतर, ते भरकटले असते. त्यांना सर्व वाईट सवयी लागल्या असत्या. त्यांच्या आयुष्यातून दारू निघून गेली हेच चांगलं झालं. ‘घटस्फोटाच्या दीड वर्ष आधीपासून मी दारू प्यायचो. मी खूप जास्त प्यायला लागलो होतो, माझा स्वतःवरचा ताबा कधीच सुटला नाही, पण मी रोज प्यायचो आणि २४ तासांत फक्त दोन तास झोपायचो. माझी झोप उडाली होती. त्यामुळे, जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा मी सर्वात आधी दारू सोडण्याचा निर्णय घेतला, कारण माझ्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी पैसे नव्हते.’ असं यतीन यांनी सांगितलं. Gaurav More : गौरव मोरेची भरारी! अभिनेत्याची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, सोबतीला अर्शद वारसी; प्रेक्षक उत्सुक ‘माझ्या वडिलांनी मला त्यांच्या घरी बोलावलं. ते म्हणाले, ‘एकटं राहू नकोस. ते योग्य नाही.’ मी निघून गेलो. मी पुन्हा त्यांचा मुलगा झालो, त्यांची सेवा करू लागलो. माझ्या वडिलांनी मला त्या अवस्थेतून बाहेर काढलं आणि समजावून सांगितलं की, मी एक चांगला अभिनेता आहे.’ असं यतीन यांनी पुढे सांगितलं.
Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा
यतीन पुढे आपलं दुःख व्यक्त करत म्हणाले, ‘माझा घटस्फोट झाला हे चांगलं झाले. एकाच छताखाली अनोळखी लोकांसारखं राहण्यात काय अर्थ आहे? माझे वडीलही म्हणाले, ‘काही हरकत नाही, दुसरी मुलगी शोध.’ माझ्यावर दबाव होता. कारण आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर लग्न केलं होतं, त्यामुळे नातं टिकवण्याचा दबाव होता. काहीही झालं तरी आम्हाला ते टिकवायचं होतं. पण मग, लग्नानंतर काय झालं, मला माहीत नाही.’ Dhananjay Powar : ‘एकदा माणूस मनातून उतरला की उतरला’, सूरज चव्हाणबद्दल असं का म्हणाला धनंजय पोवार? दरम्यान, यतीन यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त, ‘शांती’, ‘देश में निकला होगा चांद’, ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा