Pravin Tarde : ‘देऊळ बंद २’ या सिनेमानं १०० कोटी कमावले आहेत. एका मुलाखतीमध्ये प्रवीण यांनी १०० कोटी होण्यामागचं कारण सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रवीण तरडे यांनी १०० कोटी कमावण्याचं गुपित सांगितलं आहे.
…म्हणून १०० कोटींची सिनेमाची कमाई झाली
मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे म्हणाले की, ‘सिनेमानं १०० कोटी कमावण्याचं सगळ्यात मोठं गुपित काय आहे माहितीये का? ते म्हणजे नवीन आयडिया. आम्ही निर्मात्यांसोबत मिळून नवीन आयडिया केल्या. फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून राहायचं नाही ही आयडिया आम्ही केली. हे १०० कोटीच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे. थिएटरमधून पैसा येतो. पण, आम्ही त्याबरोबरच तंबू थिएटर चालवले.’ Dhananjay Powar : ‘एकदा माणूस मनातून उतरला की उतरला’, सूरज चव्हाणबद्दल असं का म्हणाला धनंजय पोवार? प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, ”देऊळ बंद २’ सिनेमा क्षमतेनुसार बॉक्स ऑफिसवर ८८ ते ९० कोटींवरच थांबला असता. ज्या भागात थिएटर नाही तिथे स्वामींच्या सेवाकेंद्रात जाऊन आम्ही २५,३०,४० रुपयांत सिनेमा दाखवला. मग तंबू थिएटरमध्ये शो केले. तंबू शोमधून सव्वाचार कोटींचं कलेक्शन आम्ही केलं. दुसरी आयडिया आम्ही केली की, संपूर्ण जगभरातील महाराष्ट्र मंडळांसोबत आम्ही संपर्क केला. त्यासाठी आम्ही एक वेगळा माणूस नेमला. परदेशात जवळपास आम्ही सव्वा दोनशे शो केले. परदेशात शो हाऊसफूल झाला तर एका शोचं कलेक्शन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जातं. अमेरिकेत आम्ही ५४-५५ शो केले. जर्मनी, कॅनडा, जपान, सिंगापूर, नेदरलँड, दुबईमध्ये शो केले. परदेशात पावणे आठ कोटी कलेक्शन झालं.’
Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?
‘सांगायचं तात्पर्य म्हणजे फक्त बॉक्स ऑफिसवर अवलंबून न राहता आम्ही वेगळ्या वाटा निवडल्या. दोन वर्ष मी सिनेमासाठी दिली आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ५० दिवस मी घरात थांबलो नाही. मी रोज प्रत्येक थिएटरमध्ये गेलो. कुठला हेअरस्टाइलिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप वगैरे नाही. माझा मोबाईल आणि मी. एक थिएटर असं नाही जिथे मी गेलो नाही. उन्हातान्हांत, पावसांत फिरलो. मुंबईत रात्रीचे शो हाऊसफूल व्हायचे. त्या शोला देखील मी गेलो, लोकांना भेटलो. प्रत्येक प्रेक्षकाला मी फोटो दिलाय. मी स्वत:हून हे सगळं केलं. हे १०० कोटी अचानक आलेले नाहीत.’ असं प्रवीण यांनी ‘विषयच भारी’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा