Headlines

WPL मध्ये हवा, मग देशासाठी खेळताना फेल का? वर्ल्डकपमधील ५ मोठ्या चुका सांगत अंजुम चोप्रांनी कोणावर फोडलं खापर?


Anjum Chopra : भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर आणि टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या या स्थितीला कारणीभूत कोणत्या गोष्टी घडल्य आहेत याच्यावर स्पष्ट भाष्य केलं आहे.

Anjum Chopra reveals 5 reasons behind India's WC exit
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा निर्णायक सामना गमावताच भारतीय महिला संघाचं टी-२० विश्वचषकातील आव्हान संपलं. पण पराभवानंतर आता सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे ती संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांची. भारताच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी थेट पाच कारणं सांगत टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विशेष म्हणजे, सध्या टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या हरमनप्रीत कौरला मात्र त्यांनी पूर्णपणे निर्दोष ठरवलं.

लॉर्ड्सवर भारताने उभारलेल्या १७० धावा ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध पुरेशा नव्हत्या, असं अंजुम यांचं स्पष्ट मत आहे. मोठ्या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर आणखी धावा करणे आणि सुरुवातीलाच दोन-तीन मोठे धक्के देणे आवश्यक असते. केवळ एक-दोन विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला रोखणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अंजुम यांनी सर्वाधिक आक्षेप घेतला तो अखेरच्या षटकांतील निर्णयांवर. जेमिमा रॉड्रिग्जला रिटायर्ड आऊट करणं आणि ऋचा घोषला खूप उशिरा फलंदाजीला पाठवणं भारतासाठी महागात पडलं, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या मते, ऋचा १७ व्या षटकातच मैदानात आली असती, तर भारताला अखेरच्या षटकांत अधिक वेगाने धावा करता आल्या असत्या. त्याशिवाय पाचव्या गोलंदाजाची समस्याही टीमपुढे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.

Maharashtra TimesIND vs IRE : ‘पहिल्या विजयाला तुक्का बोलल्यावर खेळाडूंना मी एकच गोष्ट सांगून ठेवलेली’; भारताला हरवल्यावर आयर्लंडच्या कर्णधाराचा मोठा खुलासा

फलंदाजी क्रमातील सततच्या बदलांवरही अंजुम यांनी नाराजी व्यक्त केली. यास्तिका भाटिया तिसऱ्या क्रमांकासाठी तयार असेल, तर तिला त्या स्थानावर खेळवलं का नाही? इंग्लंड मालिकेत जेमिमा तिसऱ्या क्रमांकावर खेळत होती, मग विश्वचषकात तो क्रम का बदलला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, हरमनप्रीत कौरने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती.

ऋचा घोष ही चौथ्या क्रमांकासाठी सर्वात प्रभावी फलंदाज असतानाही तिला त्या स्थानावर सातत्याने संधी देण्यात आली नाही, हीदेखील मोठी चूक असल्याचं अंजुम यांनी म्हटलं. भारतीय संघाची खरी ताकद फलंदाजी आहे. त्यामुळे फलंदाजांना त्यांच्या नैसर्गिक भूमिकेत खेळू दिलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात धावा प्रति ओव्हर गतीने खेळून विजय मिळत नाही. मोठ्या सामन्यात किमान नऊ धावा प्रति ओव्हर वेग आवश्यक असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) याच भारतीय खेळाडू तडाखेबाज क्रिकेट खेळतात आणि १८० ते २०० धावा सहज उभारतात. मात्र, भारताची जर्सी घातल्यानंतर तोच आत्मविश्वास आणि आक्रमकता दिसत नाही, अशी खंतही अंजुम यांनी व्यक्त केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय अव्वल फलंदाजांनी अपेक्षित धाडस दाखवलं नाही आणि त्याचाच फटका संघाला विश्वचषकातून बाहेर पडताना बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा