सांगलीत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पती झोपेत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : सांगलीत झोपेत असताना एक व्यक्ती बेशुद्ध झाला. तो शुद्धीवर येत नसल्याने त्याच्या पत्नीने नातेवाईकांना बोलावलं. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला रुग्णालयात आणलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांना या प्रकरणात संशय आला आणि या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, संबंधित व्यक्तीला त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवल्याचं स्पष्ट झालं. संबंधित प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीसही चक्रावले.
पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने पतीचा आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. खून केल्यानंतर पती झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. आनंदा हणमंत सर्जे (वय २८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पती दारुच्या आहारी, बेशुद्ध झाल्याचं म्हणत रुग्णालयात दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सर्जे हा दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो पत्नीला वारंवार त्रास देत असल्याचे तपासात समोर आले आहे. २५ जून २०२६ रोजी रात्री आनंद अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत पत्नी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात
सुरुवातीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
आरोपी पत्नीकडून गुन्ह्याची कबुली
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आनंदचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून खून केल्याचा संशय बळावला. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद झोपेत असताना त्याचे पाय ओढणीने बांधून त्यानंतर गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. या कारवाईत एलसीबी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा