Headlines

Why Japan Is So Clean Indian Womans Viral Video Reveals the Secret | जपानमध्ये कचरा टाकणं UPSC परीक्षेइतकंच कठीण, कचऱ्यामुळे भारतीय महिला झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ


Japanese Waste Management: जपानमध्ये स्वच्छता ही केवळ सवय नसून जीवनशैलीचा भाग आहे. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र नियम आणि दिवस निश्चित करण्यात आले आहेत. हे दर्शवणारा एका भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Japan cleanliness
(फोटो सौजन्य – pragatibhardwaj/Instagram)
स्वच्छतेच्या बाबतीत जपानचा हात कोणीच धरू शकत नाही, असं म्हणतात. कारण जपानी लोकांना अगदी शाळेत असल्यापासून स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं जातं. स्वच्छता हा त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये जपानी लोक अगदी परदेशात गेल्यानंतरही रस्त्यावरील कचरा सहज उचलताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर जपानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. ती म्हणते की, जपानमध्ये कचरा फेकणं हे UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याइतकंच कठीण आहे. आणि ती असं का म्हणतेय, हे पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.

कचरा टाकण्यासाठी वार लक्षात ठेवावे लागतात

कचरा टाकण्यासाठी वार लक्षात ठेवावे लागतात

ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यांत टाका, असा एक साधा नियम आपल्याकडे आहे. पण तरीही अनेक लोक दोन्ही प्रकारचा कचरा एकाच डब्यात टाकतात. काही बेशिस्त लोकांना तर कचरा कचरापेटीत टाकण्याचाही कंटाळा येतो. मात्र, अशा लोकांसाठी जपान एखाद्या जेलपेक्षा कमी नाही, असं म्हणता येईल. कारण जपानमध्ये जर तुम्हाला एखादी प्लास्टिकची बाटली टाकायची असेल, तर सर्वप्रथम बाटल्या टाकण्याचा वार कोणता आहे, हे पाहावं लागतं. कारण जपानमध्ये सर्व प्रकारचा कचरा एकाच दिवशी टाकता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी वेगळा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
(फोटो सौजन्य – pragatibhardwaj/Instagram)

प्रत्येक कचऱ्यासाठी वेगळा डबा

​ ​

प्लास्टिकची बाटली टाकायची झाली, तर तिचं झाकण, त्यावरील प्लास्टिकचं लेबल आणि झाकणाखालची प्लास्टिकची रिंग या तिन्ही गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात. त्यानंतर बाटली पाण्यानं स्वच्छ धुवावी लागते. त्यानंतर प्रत्येक वस्तू नेमून दिलेल्या स्वतंत्र डब्यात टाकावी लागते. जर तुम्ही चुकीच्या डब्यात कचरा टाकला, तर दंडही आकारला जाऊ शकतो.

हा व्हिडीओ pragatibhardwaj या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा