Headlines

Why Gold Silver Jewellery Wrapped in Pink Paper; सोने-चांदी गुलाबी कागदात गुंडाळण्यामागे ज्वेलर्सची दूरदृष्टी; पिवळा किंवा इतर रंगाचा का नाही? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर


Gold amd Silver Jewelery Wrapping Story: तुम्ही कधी शहरातील एखाद्या पारंपरिक दागिन्यांच्या दुकानातून सोने किंवा चांदीचे दागिने किंवा भांडी खरेदी केली आहे का? हो, तर दागिना तिजोरीत ठेवण्यापूर्वी लहान गुलाबी कागदात गुंडाळून ठेवला जातो, हे तुम्ही नक्कीच पाहिले असेल.सोनार नेहमी सोन्या-चांदीचे दागिने गुलाबी कागदात का गुंडाळायतात आणि आता तसं का करत नाही?

Why Gold Silver Jewellery Wrapped in Pink Paper
सोने-चांदीचे दागिने गुलाबी कागदात का गुंडाळले जातात?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Silver Jewellery Buying: सणासुदीचे दिवस असो किंवा लग्नसराईचा हंगाम आपल्या देशात सोने खरेदीची लोकांना प्रचंड आवड आहे. पारंपरिक सराफा किंवा ज्वेलरच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला अनेकदा आढळलं असेल की दागिने गुलाबी कागदात बांधून दिले जातात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सोनार नेहमी सोन्या-चांदीचे दागिने गुलाबी कागदात का गुंडाळतात? एकेकाळी भारतातील अनेक दागिन्यांच्या दुकानांमध्ये प्रचलित होती, जी अजूनही काही प्रमाणात पाहायला मिळते.

सोने-चांदीचे दागिने बॉक्समध्ये ठेवण्याआधी लहान गुलाबी कागदात गुंडाळले जातात. गुलाबी कागदाचा वापर केवळ सौंदर्यासाठी केला जात नव्हता, तर यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Maharashtra TimesTATA Leadership Feud: एन. ‘चंद्रा’च्या राजीनाम्यामुळे TATA समूहात मोठं वादळ, सत्तासंघर्ष तीव्र, नोएल टाटा निवडणार साम्राज्याचा पुढचा किंगमेकर

सोने-चांदीचे दागिने गुलाबी कागदातच का गुंडाळले जातात?

आकर्षिक पॅकेजिंग आणि डिझायनर बॉक्सचा ट्रेंड सुरू होण्याआधी दागिन्यांची दुकाने सामान्यतः मौल्यवान दागिने रंगीत कागदात गुंडाळायची, ज्यासाठी विशेषतः गुलाबी कागद वापरला जायचा. मौल्यवान दागिन्यांना इतर वस्तूंपासून वेगळे ओळखणे यामागचे कारण होते. हळूहळू गुलाबी कागद दागिन्यांचे वेगळेपण जतन करून विशेष आणि मौल्यवान वस्तू ओळखण्याचे प्रतीक बनला. आजही काही छोट्या-मोठ्या, कौटुंबिक दागिन्यांच्या दुकानात ही परंपरा पाहायला मिळते. पण मोठ्या शहरांमधील दुकानांमध्ये ही प्रथा खूप दुर्मिळ झाली आहे.

गुलाबी कागदामागचा हेतू काय?

आजच्या काळात लोक या गुलाबी कागदाला जुनी परंपरा किंवा भावनिक प्रथा मानतात, पण दागिन्यांचे व्यापारी म्हणतात की यामागील उद्देश दागिन्यांची चमक टिकवून ठेवण्याचाही होता. सोन्या-चांदीचे दागिने महाग असतात आणि खरेदीदारांना वर्षांनुवर्षे चमक टिकून राहावी असं वाटतं.

Maharashtra TimesChina Tariff-Evasion Network: भारताच्या ‘मित्राने’ आधी 100% टॅरिफ लादला आता चौकशी करणार! चीनच्या मदतीने अमेरिकन टॅरिफ बुडवल्याचा आरोपपण गुलाबी कागदच का? इतर कोणता रंग का नाही? असाही प्रश्न मनात येतो. तर यामागंच कारण म्हणजे की सफेद धातू लवकर काळवंडते म्हणून चांदीच्या दागिन्यांसाठी गुलाबी कागद विशेषतः उपयुक्त मानला जातो. बहुतेक गुलाबी कागदावर एक हलका संरक्षक थर असतो, जो ओलावा आणि हवेच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत करतो. म्हणूनच इतर रंगांच्या तुलनेत गुलाबी कागदाला अधिक पसंती दिली जाते.

दागिन्यांना कागदात गुंडाळल्याने ओलावा आणि धुळीपासून संरक्षण होण्यास मदत होते. या पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे धातूंना गंज चढू शकतो, पण कागदामुळे दागिने आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये पातळ संरक्षक थर तयार होतो. त्यामुळे, हाताळताना आणि ठेवताना ओरखडे आणि किरकोळ नुकसान होण्याचा धोकाही कमी होतो. तसेच खडे सुटण्यापासून किंवा किरकोळ झिजेपासून संरक्षण मिळण्यासही मदत झाली.

Maharashtra TimesEPF Pension Calculator: 15 वर्षे प्रायव्हेट नोकरी, 10,000 ते 15000 सॅलरीवर इतकी मिळेल पेन्शन, या फॉर्म्यूल्याने करा कॅलक्युलेट

शुद्ध सोनं आणि मिक्स्ड सोन्याच्या दागिन्यांमधील फरक

शुद्ध सोन्याला सामान्यतः गंज चढत नाही, पण बहुतेक दागिने 24 कॅरेट सोन्याचे बनवलेले नसतात. बहुतेक सोन्याच्या दागिन्यांमध्ये तांबे किंवा चांदीसारखे इतर धातू मिक्स केले जातात. या मिश्रधातूंवर आर्द्रता आणि हवेचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कालांतराने रंगात किंचित बदल होऊ शकतो. हीच प्रक्रिया मंदावण्यासाठी एक पातळ लेअर म्हणून गुलाबी कागदाचा वापर केला जातो.