Headlines

Why drooling during sleep happens know sinus GERD and neurological causes; झोपेत तोंडातून लाळ का गळते? जाणून घ्या कारणे आणि उपाय


झोपेत तोंडातून लाळ गळणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या असली तरी त्यामागे काही गंभीर आरोग्यविषयक कारणे असू शकतात. सायनस, सर्दी, तोंडातून श्वास घेणे किंवा स्लीप ॲप्नियामुळे झोपेत तोंड उघडे राहते आणि लाळ बाहेर येऊ लागते. काही वेळा GERD किंवा पचनसंस्थेच्या समस्यांमुळे शरीर अधिक लाळ तयार करते. तर मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांमुळे लाळ गिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. ही समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या झोपेत लाळ गळण्यामागील वैज्ञानिक कारणे आणि उपाय.

saliva drooling causes remedies
saliva drooling causes remedies
सामान्यत:, आपण जागे असताना लाळ सतत गिळत असतो त्यामुळे ती तोंडात साचत नाही. मात्र, झोपेच्या दरम्यान जेव्हा आपल्या चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल (Relax) होतात, तेव्हा लाळ तोंडात साचते आणि ती बाहेर गळू लागते. ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन’ नुसार, जर ही समस्या अधूनमधून होत असेल तर ती झोपेच्या स्थितीमुळे असू शकते, पण जर ती दररोज होत असेल, तर त्यामागे काही शारीरिक दोष असू शकतात.

सायनस आणि श्वसनाशी संबंधित समस्या (Sinus & Respiratory Issues)

सायनस आणि श्वसनाशी संबंधित समस्या (Sinus & Respiratory Issues)

क्लेव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, लाळ गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे नाकाऐवजी तोंडातून श्वास घेणे.

  • नाकातील अडथळा : सायनस इन्फेक्शन, सर्दी, किंवा नाकाचे हाड वाढलेले असल्यास (Deviated Septum) व्यक्ती नाकाने श्वास घेऊ शकत नाही.
  • तोंड उघडे राहणे : जेव्हा आपण तोंडातून श्वास घेतो, तेव्हा तोंड उघडे राहिल्यामुळे लाळ सहज बाहेर गळते.
  • स्लीप ॲप्निया (Sleep Apnea) : हा एक गंभीर विकार आहे ज्यात झोपेत श्वास वारंवार थांबतो. अशा रुग्णांमध्ये लाळ गळण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

पचनसंस्थेशी संबंधित समस्या (Digestive Issues)

पचनसंस्थेशी संबंधित समस्या (Digestive Issues)

पचनाचा आणि लाळेचा जवळचा संबंध आहे, कारण लाळ हे पचनाचे पहिले माध्यम आहे.

  • GERD (ॲसिड रिफ्लक्स) : स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार, जेव्हा पोटातील ॲसिड अन्नाच्या नळीतून वर येते, तेव्हा ते लाळ ग्रंथींना उत्तेजित करते. शरीर या ॲसिडला न्यूट्रलाईज करण्यासाठी जास्त लाळ तयार करते, ज्याला ‘वॉटर ब्रश’ म्हणतात.
  • पोटातील जंत (Deworming) : आयुर्वेदिक आणि काही वैद्यकीय मतांनुसार, पोटातील जंतांमुळे विशेषतः मुलांमध्ये शरीरात लाळेची निर्मिती वाढू शकते.

मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित संकेत (Neurological Causes)

मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित संकेत (Neurological Causes)

पर्किन्सन फाऊन्डेशनच्या रिपोर्टनुसार, जर लाळ गळण्याचे प्रमाण खूप जास्त असेल, तर ते मेंदूच्या सिग्नलिंगमधील बिघाड असू शकतो.

  • डिस्फेजिया (Dysphagia) : अन्न किंवा लाळ गिळताना त्रास होणे. हे स्नायूंच्या कमकुवतपणामुळे किंवा मेंदूच्या काही विकारांमुळे (उदा. पार्किन्सन किंवा स्ट्रोकचे पूर्वसंकेत) होऊ शकते.
  • चेहऱ्याच्या नसांची कमजोरी : जर चेहऱ्याचे स्नायू योग्यरित्या नियंत्रित नसतील, तर ओठ पूर्णपणे बंद होत नाहीत, ज्यामुळे लाळ बाहेर येते.

इतर महत्त्वाची कारण

इतर महत्त्वाची कारण

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रसिद्ध एका अहवालानुसार,

  • औषधांचे परिणाम : काही मानसिक आजारांवरील औषधे किंवा अँटी-सायकोटिक ड्रग्समुळे लाळेची निर्मिती (Hypersalivation) वाढते.
  • झोपेची चुकीची स्थिती : पालथे (पोटावर) किंवा कुशीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षणामुळे लाळ बाहेर गळते. पाठीवर झोपल्यास लाळ नैसर्गिकरित्या घशात जाते.

उपाय आणि काळजी

उपाय आणि काळजी
  • झोपण्याची पद्धत बदला : पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लाळ तोंडातून बाहेर पडणार नाही.
  • सायनसवर उपचार : जर नाक बंद राहत असेल, तर वाफ घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने नेझल स्प्रे वापरा.
  • ॲसिडिटीवर नियंत्रण : रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी करा आणि जड अन्न टाळा.
  • पाण्याचे प्रमाण : शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) असल्यास लाळ घट्ट होते आणि जास्त तयार होऊ शकते, त्यामुळे दिवसा भरपूर पाणी प्या.

ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचाही संबंध (Stress & Mental Health Connection)

ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचाही संबंध (Stress & Mental Health Connection)

काही संशोधनांनुसार सततचा ताण (Chronic Stress), चिंता (Anxiety) आणि अपुरी झोप यामुळे शरीराच्या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टमवर परिणाम होतो. यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते आणि झोपेदरम्यान तोंड उघडे राहणे, दात घासणे (Bruxism) किंवा लाळ जास्त प्रमाणात तयार होणे अशा समस्या वाढू शकतात. विशेषतः ज्या लोकांना ताणामुळे रात्री वारंवार जाग येते किंवा घोरण्याची समस्या असते, त्यांच्यात झोपेत लाळ गळण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, नियमित झोप, स्क्रीन टाइम कमी करणे आणि रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर केल्यास ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.

झोपेत लाळ गळणे हे बहुतेक वेळा सायनस किंवा चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे असते. मात्र, जर यासोबतच तुम्हाला गिळताना त्रास होणे, रात्री श्वास गुदमरणे किंवा तीव्र ॲसिडिटीची लक्षणे असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. शरीरातील ‘स्वेल्लोईंग रिफ्लेक्स’ (गिळण्याची क्रिया) तपासणे अशा वेळी गरजेचे ठरते.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 29, 2026, 11:52 AMMedically Reviewed byDr Saiprasad Girish Lad
  • Jul 29, 2026, 11:52 AMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम