Headlines

Which House Has the Most Money This Viral IQ Puzzle Has Everyone Guessing | Logic Puzzle: एका घरासमोर कार उभी दुसऱ्या घरासमोर सायकल, कोणत्या घरामध्ये आहेत जास्त पैसे? ९९% लोकांनी दिलेय चुकीचं उत्तर


House Puzzle: A, B, C आणि D अशी चार घरं तुमच्यासमोर आहेत. या घरांचं नीट बारकाईने निरीक्षण करा आणि कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे ठेवले आहेत, ते शोधून सांगा.

Brain Teaser
(फोटो सौजन्य – puzzlesbyfarhan/Instagram)
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं डोकबाज असणं गरजेचं आहे. तर कोडं असं आहे, तुमच्यासमोर A, B, C आणि D अशी चार घरं आहेत. ही चारही घरं नीट पाहा आणि सांगा, यापैकी कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे आहेत? चला पाहूया, तुमच्यापैकी कोण या कोड्याचं उत्तर शोधून काढतं.

काय असेल उत्तर बरं?

​ ​

A घरासमोर स्कूटी आहे आणि दिसायलाही हे घर ठीकठाक वाटत आहे. B घरासमोर कार पार्क केली आहे. शिवाय गच्चीवर सोलर पॅनल लावले आहेत. C हे घर तुलनेने थोडं साधं दिसत आहे. तर D हे घर नसून जणू बंगलाच असल्याचं दिसत आहे. पाहताच क्षणी या घरात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा असल्याचं जाणवतं.

ही चारही घरं नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या.





बराच वेळ विचार करूनही तुम्हाला या कोड्याचं उत्तर देता आलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा. त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.

योग्य उत्तर आहे – C

योग्य उत्तर आहे - C

चारही पर्याय पाहिल्यानंतर पहिल्या नजरेत C हे घर सर्वात साधं वाटतं. पण याच घरात एक महत्त्वाचा क्लू लपलेला आहे. जर तुम्ही या घराचं बारकाईने निरीक्षण केलं, तर मुख्य दरवाजावर दोन CCTV कॅमेरे दिसतील.

आता प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा – ‘कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे आहेत?’ प्रश्नात ‘कोणतं घर सर्वात श्रीमंत दिसतं?’ असं विचारलेलं नाही. वरकरणी C घर साधं दिसत असलं, तरी त्यावर इतर घरांच्या तुलनेत अधिक सुरक्षा व्यवस्था आहे. सामान्यतः मौल्यवान वस्तू, रोख रक्कम किंवा महत्त्वाच्या वस्तूंचं संरक्षण करण्यासाठीच लोक CCTV कॅमेरे लावतात. त्यामुळे या कोड्यानुसार C हेच योग्य उत्तर मानलं आहे.

असो, या कोड्याचं उत्तर तुम्ही काही वेगळं काढलं आहे का? असेल तर त्यामागचं कारण काय? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
(फोटो सौजन्य – puzzlesbyfarhan/Instagram)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा